Home Breaking News वेकोली अधिकाऱ्यांना आमदारांनी फटकारले

वेकोली अधिकाऱ्यांना आमदारांनी फटकारले

● अन्यथा.... खदानीचे काम बंद पाडू

1280
C1 20240516 18505894

अन्यथा…. खदानीचे काम बंद पाडू

Wani News | उकणी ते वणी रस्त्याच्या रेंगाळलेल्या बांधकामाबाबत उकणी ग्रामपंचायतच्या वतीने निवेदन देण्यात आले. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी वेकोली अधिकारी व कंत्राटदाराला गावाजवळील रस्त्यावर बोलावून ग्रामस्थासमोर चांगलेच फटकारले असून पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे बांधकाम करावे अन्यथा…. खदानीचे काम बंद पाडू असा इशारा दिला. Construction of the road should be done before monsoon otherwise…. stop the quarry work

उकणी ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन खाडे यांनी वेकोली निर्मित समस्या व ग्रामस्थांना होत असलेला त्रास आ. बोदकुरवार यांना अवगत करून दिला. आमदारांनी तडक उकणी गाठून वेकोली अधिकारी वणी नार्थ क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक गुप्ता, उप क्षेत्रीय प्रबंधक फुलारे, स्टाफ ऑफिसर (सिव्हिल) सरकार यांना उकणी येथे बोलावले व चर्चा केली.

याप्रसंगी सरपंच खाडे यांनी नुकत्याच अचानक झालेल्या पावसामुळे रस्ता पूर्णपणे चिखलमय झाल्याने ग्रामस्थांना सदर रस्त्याहून वाहन काढतांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागल्याचे स्पष्ट केले. या समस्येबद्दल व अवघ्या काही दिवसात येणाऱ्या पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या संभाव्य समस्येबद्दल आमदार व अधिकारी यांना अवगत करून दिले.

ग्रामस्थांना होत असलेल्या त्रासातून तात्काळ मुक्तता व्हावी याकरिता आमदारांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तर लवकरात लवकर रस्त्याचे बांधकाम करावे अशा सूचना दिल्या. वेळकाढुपणा व टाळाटाळ केल्यास खदानीचे काम बंद पाडू असा इशारा दिला.

यावेळी उकणी ग्रामपंचायत चे उपसरपंच नरेंद्र बलकी, ग्रामपंचायत सदस्या कविता शेंद्रे, आचाल रोडे, रंजू कातरकर, शोभा शिवरकर, सुरेश ढपकस, महादेव रोडे, नत्थूजी खाडे, ताराचंद राजपूत व गावातील महिला व पुरुष मोठया संख्येने उपस्थित होते.
Rokhthok News