Home Breaking News वर्धा नदीत 15 वर्षीय बालकाला जलसमाधी

वर्धा नदीत 15 वर्षीय बालकाला जलसमाधी

● पोहायला जाणे जीवावर बेतले

1119
C1 20240526 21024752
C1 20241123 15111901

पोहायला जाणे जीवावर बेतले

Sad News | मारेगाव तालुक्यातील दांडगाव (आपटी) शिवारातील वर्धा नदीपात्रात 15 वर्षीय बालक बुडाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. तो मित्रांसोबत वर्धा नदीत पोहायला आला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने अनर्थ घडला असून तो वरोरा तालुक्यातील निवासी असल्याचे बोलल्या जात आहे. A 15-year-old boy drowned in Wardha riverbed on Sunday afternoon.

मानव अविनाश राऊत (15) असे मृतक बालकाचे नाव आहे. तो चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील रहिवाशी आहे. मारेगाव व वरोरा तालुक्याच्या मधून प्रवाहित असलेल्या वर्धा नदीत तो यश गणेश लसने (14) आणि यथार्थ भोलेशंकर परचाके (14) या मित्रांसमवेत पोहायला आला होता. मनसोक्त जलतरण करत असताना त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो गटांगळ्या खायला लागला.

मानव पाण्यात बुडल्याचे मित्रांना दिसताच एकच कल्लोळ माजला. मित्र कमालीचे घाबरले, आरडाओरडा करायला लागले आणि गावी परतले. मानव कुठे आहे असे मानवच्या पालकांनी विचारलं असता त्यांनी घडलेली घटना सांगितली. पालकांनी व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. वर्धा नदीत शोधाशोध केली. पोलिसांना कळविण्यात आले. काही वेळाने त्याचा मृतदेह मिळाला असून उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
Rokhthok News