Home Breaking News त्यांच्यावर..फौजदारी गुन्हे दाखल करा !

त्यांच्यावर..फौजदारी गुन्हे दाखल करा !

● शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान ● मनसे आक्रमक, SDO ना निवेदन

458
C1 20240528 11121514

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
मनसे आक्रमक, SDO ना निवेदन

MNS NEWS | वीज वाहक मोठमोठे टॉवर्स शेतकऱ्यांच्या शेतात स्थापित करण्यात आले आहे. पीडित शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला अत्यल्प देण्यात आला असून जागेच्या किमतीनुसार आर्थिक मोबदला द्यावा अशी मागणी मनसे नेते राजू उंबरकर यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. त्याप्रमाणेच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे अन्यथा मनसे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे. Criminal cases should be filed against companies causing financial loss to farmers

वणी विधानसभा मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधून वीज वाहतूक करणारे मोठमोठे टॉवर्स उभे करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी तसेच संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या. शेतकऱ्यांनी आवाज उठविल्यास त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्याची ताकीद प्रशासनामार्फत देण्यात येत असल्याने शेतकरी हतबल झाला होता.

त्या कंपनी प्रशासनाकडून झालेल्या अन्यायाचे निवारण होत नसल्याने पीडित शेतकरी मनसे नेते राजू उंबरकर यांना भेटले. त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या असता न्याय मिळवून देणारच असा पवित्रा उंबरकरांनी घेतला. टॉवरच्या मोबदल्यात त्या ठिकाणी जागेच्या किमतीनुसार शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देणे क्रमप्राप्त असताना शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचे याप्रकारामुळे समोर आले आहे.

संबंधित कंपन्यांनी आपले कामे आटोपून विभागातून पळ काढलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता उर्वरीत रक्कम कुणाकडे मागायची असा प्रश्न उभा ठाकला आहे. या प्रकारात उपविभागीय अधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून त्या सर्व कंपन्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून या सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीचे योग्य ते मोबदले मिळवून द्यावे, अन्यथा आपण या कंपन्यांना पाठीशी घालून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करीत असल्याचे समजून महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या 1 जून पासून उपविभागीय कार्यालया समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी वाहतूक इरशाद खान, धनंजय त्रिंबके, फाल्गुन गोहोकार, शिवराज पेचे, अजिद शेख, गुड्डू वैद्य, मयूर गेडाम, इरफान सिद्दीकी, लक्की सोमकुंवर, रणजित बोंडे, शम्स सिद्दीकी, उमर शरीफ,युनूस सैय्यद, वैभव पुराणकर, हिमांशू बोहरा, शेहबाज खान, साई आंदलवार, आयाज खान, शिवा शर्मा, नोमान शेख, रोहन वरारकर, रूचिर वैद्य, सारंग चिंचोलकर, संतोष लक्षशेट्टीवार, रोहन पारखी, संस्कार तेलतुंबडे, पराग निमसटकर, आदित्य आलंबलवार यांच्यासह मोठया संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
Rokhthok News

Previous article“संजय”.. विधानसभेतील तुल्यबळ उमेदवार… !
Next articleलायन्स हायस्कूलचे घवघवीत यश
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.