Home Breaking News अल्‍पवयीन मुलांचा दारु दुकानांवर राबता..!

अल्‍पवयीन मुलांचा दारु दुकानांवर राबता..!

● उत्‍पादन शुल्‍क विभाग निद्रेत ● व्‍यसनाधिनतेकडे वळतेय तरुण पिढी

1552
C1 20240530 11592217
Img 20241016 Wa0023

उत्‍पादन शुल्‍क विभाग निद्रेत
व्‍यसनाधिनतेकडे वळतेय तरुण पिढी

Excise Department News | पुणे शहरात अल्‍पवयीन मुलांच्‍या कृत्‍यामुळे उत्‍पादन शुल्‍क विभाग व पोलीस प्रशासनाची अब्रु चव्‍हाटयावर आली आहे. राज्‍यात नियमबाहय वर्तन करणाऱ्या दारु दुकानांवर कारवायाचे सञ सुरु आहे. वणी शहरात सुध्‍दा पहाटेच उघडणारी व राञी उशीरा बंद होणारी दारु दुकाने आहेत तर बहुतांश दारु दुकानांवर अल्‍पवयीन मुलांचा राबता दिसून येत असतांना उत्‍पादन शुल्‍क विभाग माञ निद्रावस्‍थेत आहे. Actions are on against illegal liquor shops in the state.

आर्थिकदृष्‍टया परिपुर्ण असलेल्‍या वणी उपविभागात मोठया प्रमाणात दारुची दुकाने स्‍थापीत झाली आहे. वणी परिक्षेञात बिअरबार 65, बिअर शॉपी 8, देशी दारु भटया 21 तर दोन वाईन शॉप आहेत. शहरातील अनेक दारु दुकाने भल्‍या पहाटे उघडत असल्‍याचे सत्‍य नाकारता येत नाही तर राञी उशीरापर्यंत चालणाऱ्या दारु दुकानांना मुकसंमती कोणाची हे समजण्‍याइतपत नागरीक सुज्ञ आहेत.

बिअरशॉपी लगत मद्य प्राशन करण्‍यास मनाई आहे, माञ शहरातील काही शॉपींनी ग्रीन नेट लावून मद्यपीना मद्य पिण्‍याची व्‍यवस्‍था केल्‍याचे सर्वश्रृत असतांना उत्‍पादन शुल्‍क विभागाच्‍या अधिकाऱ्यांना दिसू नये हे न उलगडणारे कोडे आहे. त्‍याप्रमाणेच झाडा झुडपांचा व अंधाराचा आधार घेत अल्‍पवयीन मुलांचे टोळके मद्याचा सर्रास आस्‍वाद घेत असल्‍याचे दिसून येत आहे.

शहरातील दारु दुकानांत अल्‍पवयीन मुलांची रेलचेल असते का हे शोधण्‍याचे काम संबधीत विभागाचे आहे. सीसीटिव्‍ही फुटेजची तपासणी केल्‍यास सत्‍य उघड होणार आहे. तसेच नियमबाहय पध्‍दतीने दारु दुकाने उघडल्‍या व बंद केल्‍या जात असेल तर अनुज्ञप्‍ती रदद करण्‍याचं प्रावधान असुन कठोर कारवाई माञ होतांना दिसत नाही. उत्‍पादन शुल्‍क विभागासोबतच पोलीस प्रशासनाने या गंभीर बाबीकडे कटाक्षांने लक्ष देण्‍याची गरज निर्माण झाली असुन निव्‍वळ कारवाईचा फार्स अपेक्षीत नाही.

येथील उत्‍पादन शुल्‍क विभागाच्‍या कार्यालयात एक अधिकारी व एक कर्मचारी आहेत. त्‍यातच कर्मचाऱ्याला चेकपोस्‍ट तसेच अन्‍यञ कर्तव्‍य पार पडावे लागते. तसेच नियमबाहय वर्तन करणाऱ्या दारु दुकानांवर कारवाया सातत्‍याने होत असतात. त्‍याप्रमाणेच 21 वर्षाखालील मुलांना मद्यसाठा वितरीत करु नये असे स्‍पष्‍ट निर्देश दारु दुकानदारांनादिले आहे. असे आढळल्‍यास कारवाई करण्‍यात येईल.
संजय बोढेवार
दुययम निरिक्षक, उत्‍पादन शुल्‍क विभाग वणी
Rokhthok News

Previous articleलायन्स हायस्कूलचे घवघवीत यश
Next articleExit polls | देशमुख, धानोरकर, आष्टीकर यांना कौल
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.