● Exit poll म्हणजे मतदारांचं मत नव्हे ?
Sunil Patil- Wani | चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे चांगलेच प्राबल्य आहे. मतदार सुज्ञ असून विकासाच्या दृष्टीने आपले मत मांडताना आजपर्यंत दिसून आले आहे. त्याप्रमाणेच या लोकसभा मतदारसंघाने कधीच जातीय समिकरणाला थारा दिला नाही. “निवडून तर येणार सुधीर मुनगंटीवार” असा दावा शिवसेना शिंदे गटाचे मनीष सुरावार यांनी केला आहे. Manish Surawar of Shiv Sena Shinde group has claimed that “Sudhir Mungantiwar will come if elected”.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात भाजपची चांगली संघटनात्मक बांधणी आहे. बूथ लेव्हल पर्यंत कार्यकर्त्यांची फळी आहे. केळापूर-आर्णी, वणी व बल्लारपूर या विधानसभेत भाजपा प्रतिनिधित्व करताहेत. यवतमाळ जिल्ह्यातील दोन्ही विधानसभेने मागील लोकसभा निवडणुकीत 59 हजाराच्या वर भाजप उमेदवाराला मताधिक्य दिले होते.
सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे राज्यातील दुसऱ्या नंबर चे लोकनेते आहेत. उच्च शिक्षित, अभ्यासु व्यक्तिमत्त्व आहेत, विकासाचं व्हिजन असणारा नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. संपूर्ण लोकसभा मतदारसंघात त्यांना ओळखणारा मतदार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी आजोळ तर चंद्रपूर कर्मभूमी असल्याने दोन्ही जिल्ह्यात त्यांना मानणारा सर्वपक्षीय जनसमुदाय असल्याने त्यांचा विजय पक्का असल्याचं मत सुरावार यांनी व्यक्त केले आहे.
Rokhthok News