● आठ दिवसांत प्रक्रिया, आरोग्य मंत्र्यांची ग्वाही
● राजु उंबरकर यांच्या मागणीला यश
Wani News | वणी ग्रामीण रुग्णांलयाला उपजिल्हा रुग्णांलयांचा दर्जा मिळावा याकरीता महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रचंड आग्रही आहे. मागील अनेक वर्षा पासुन होत असलेला पाठपुरावा सार्थकी लागल्याचे दिसत आहे. मनसे नेते राजु उंबरकर यांनी नुकतीच आरोग्य मंञी तानाजी सावंत यांची भेट घेत वणी उप विभागातील आरोग्य विषयक समस्येचा पाढा वाचला. याप्रसंगी आठ दिवसांत उपजिल्हा रुग्णांलयाबाबतची प्रक्रिया पुर्ण करण्यात येईल अशी ग्वाही आरोग्य मंत्र्यांनी दिली. MNS leader Raju Umbarkar recently met Health Minister Tanaji Sawant.
वणी विधानसभा क्षेत्रात उपजिल्हा रुग्णालय अस्तित्वात येण्यासाठी मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी अनेकदा प्रयत्न केले, तर शासनदरबारी पाठपुरावा केला आहे. त्याप्रमाणेच वेळोवेळी उग्र स्वरुपांचे आंदोलने केली आहेत. दिनांक 14 एप्रिल 2021 पासु 5 दिवस आमरण उपोषण देखील करण्यात आले होते. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींची उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप उंबरकरांनी केला आहे.
मनसेने रुग्णसेवेच्या माध्यमातून आरोग्यसेवेचा विडा उचलला आहे. ही बाब तत्कालीन दिवंगत आ. रमेश वांजळे यांना समजली आणि त्यांनी त्यावेळेसचे आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांच्या निदर्शनास आणली. राज्यात सन 2001 च्या लोकसंख्येवर आधारित आरोग्य संस्था स्थापनेचा बृहत आराखडा तयार करण्यात आला. अस्तित्वात असलेल्या 30 खाटाच्या ग्रामीण रुग्णालयाचे 50 खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात आले. तर राज्यातील 34 ठिकाणी मान्यता देण्यात आली. वणी वगळता अन्य ठिकाणचे उपजिल्हा रुग्णालय सुरु झाली आहेत.
वणी उपविभागाची भौगोलिक परिस्थिती बघता याठिकाणी उपजिल्हा रुग्णालय व ट्रामा केयर युनिट अपेक्षित आहे. उपजिल्हा रुग्णालय झाल्यास अनेक वैद्यकीय प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. सद्यस्थितीत येथे ग्रामीण रुग्णालय अस्तित्वात आहे. त्यामुळे येथील बहुतांश रुग्णांना चंद्रपूर, नागपूर किंवा वर्धा या ठिकाणी पुढील उपचारासाठी रेफर करावे लागते.
आरोग्याच्या दृष्टीने वणी मतदारसंघातील जनतेची सर्वात मोठी समस्या लक्षात घेता. राज्य शासनाच्या माध्यमातून तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाच्या सुविधा लागू करण्यासाठी मदत करावी व उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्व रुग्णांच्या आजारावर उपचार व्हावेत अशी मागणी आरोग्य मंञी तानाजी सावंत यांना निवेदनातुन केली आहे. याप्रसंगी लवकरच उपजिल्हा रुग्णांलयांची प्रक्रिया पुर्ण करु अशी ग्वाही आरोग्य मंत्र्यांनी दिली असुन अवघ्या आठ दिवसांत उपजिल्हा रुग्णांलयांची मुहूर्तमेढ रोवल्या जाईल असे उंबरकरांनी सांगीतले.
Rokhthok News