● कंपनी विरोधात आंदोलन व आमरण उपोषण
● भालर ग्रामपंचायतीचे एसडीओंना निवेदन
WANI NEWS | आचारसंहितेच्या काळात गटविकास अधिकारी (BDO)यांनी हारमोनी मिनरल्स कंपनीला NOC दिल्याचा धक्कादायक आरोप भालर ग्रामपंचायतीने केला आहे. कंपनीला देण्यात आलेल्या नाहरकत परवानग्या रद्द करण्यात याव्यात व होत असलेले अनधिकृत बांधकाम थांबवावे, अन्यथा कंपनी समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा एसडीओंना दिलेल्या निवेदनातुन देण्यात आला आहे. Shocking allegation that block Development Officer (BDO) gave NOC to Harmony Minerals Company during Code of Conduct
भालर गावालगतच मे. हारमोनी मिनरल्स कंपनीचे बांधकाम अनधिकृतरित्या सुरु आहे. ग्रामपंचायतीने कोणतीही नाहरकत परवानगी दिलेली नाही. अकृषक व बांधकाम परवानगी मिळण्यापुर्वीच कंपनीच्या वतीने मागील दोन महिन्या पासुन बांधकाम करण्यात येत आहे. संबधीत बांधकाम अनधिकृत असल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे.
अनधिकृत बांधकामाबाबत ग्रामपंचायतीने अनेकदा तक्रारी केल्या आहेत. त्याप्रमाणेच भालर गावाच्या हद्दीत कंपनीची एक शाखा सुरु असुन प्रदुषणामुळे ग्रामस्थ बेजार झाले आहेत. पुन्हा नव्याने होणाऱ्या हारमोनी कंपनीमुळे प्रदुषणात वाढ होणार असुन भविष्यात अनेक दुष्परिणामाला सामोरे जावे लागणार आहे यामुळेच ग्रामस्थ कंपनीला विरोध करताहेत.
आचारसहितेच्या काळात हारमोनी कंपनीला गट विकास अधिकारी यांनी नाहरकत प्रमाणपत्र देवून ग्रामपंचायतच्या अधिकाराचे हनन केल्याचा आरोप निवेदनातुन केला आहे. तसेच पंचायत समितीचा जाहिरनामा 16 मे ला ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आला असुन त्याची मुदत 17 जुन पर्यंत आहे व त्यानंतर आक्षेप व सुनावणी होईल असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. तर सबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी कंपनीच्या आर्थिक व राजकीय दबावाला बळी पडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सदर कंपनीचे अनधिकृतपणे सुरू असलेले बांधकाम बंद करून केलेले संपूर्ण बांधकाम पाडण्यात यावे व सदर कंपनीला दिल्या गेलेल्या सर्व परवानग्या रद्द करण्यात याव्या या करिता ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच सदस्य व समस्त गावकरी मे. हारमोनी मिनरल्स या कंपनीच्या विरोधात दिनांक 18 जुन पासुन आंदोलन करणार आहेत तर समस्त गावकरी आमरण उपोषणाला बसत असल्याचा ईशारा देण्यात आला आहे.
● नियमांनुसारच परवानग्या दिल्या ●
मे. हारमोनी मिनरल्स कंपनीने सर्वप्रथम ग्रामपंचात भालर यांना नाहरकत मिळावी याकरीता अर्ज सादर केला होता. परंतु एक महिन्यांचा कालावधी लोटला तरीही परवानग्या दिल्या नाहीत म्हणुन आपसुकच हे अपिलीय प्रकरण पंचायत समितीकडे आले. नाहरकत (NOC) देणे हा रेगुलर प्रशासकीय कामकाजाचा भाग आहे यामुळे आचारसंहितेत नाहरकत प्रमाणपञ देण्यात आले यात नियमांचा कोणताही भंग करण्यात आलेला नाही.
किशोर गज्जलवार
गटविकास अधिकारी, पंचायत समिती, वणी
ROKHTHOK NEWS