Home Breaking News अस्मानी संकट नित्याचेच, सुलतानी संकटाचे काय ?

अस्मानी संकट नित्याचेच, सुलतानी संकटाचे काय ?

● विज वितरण विरोधात मनसे आक्रमक

501
C1 20240621 13481056
Img 20241016 Wa0023

विज वितरण विरोधात मनसे आक्रमक

Wani News | नक्षञ लागुन बरेच दिवस झालेत माञ पेरणीयोग्‍य पाउस पडलेला नाही यामुळे शेतकरी हतबल झाला असुन महावितरणच्‍या अनागोंदी प्रकारामुळे सिंचनापासुन सुध्‍दा वंचित राहत आहेत. तर अनेक शेतकरी, कृषीकेंद्र चालकांच्‍या अडेलतट्टू धोरणामुळे आर्थिक विवंचनेत अडकताहेत. अस्‍मानी संकटाचा सामना करता येईल माञ सुलतानी संकटाचे काय असा प्रश्‍न उपस्थित करत मनसे नेते राजु उंबरकर आक्रमक झाले आहेत. Asmani crisis can be faced but what about Sultani crisis

निसर्गाच्या अवकृपेने मृग नक्षत्र लागून सुद्धा आजवर जोरदार पाऊस तालुक्यात झाला नाही. त्यामुळे पेरलेले बियाणे जमिनीतील उष्णतेने जळून जात आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्याकडे ओलिताची व्यवस्था व मुबलक पाण्याचे स्त्रोत आहेत. या आधारे ते शेती करू शकतात, मात्र त्यासाठी लागणारा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकऱ्यांपुढील हा पर्याय बंद झाला आहे. परिणामी तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी महावितरण ची कामे पूर्ण केली जातात. दर 25 वर्षात विजेची तारे आणि खांब बदलणे अनिर्वाय आहे. बऱ्याच ठिकाणी जीर्ण झालेले खांब सुद्धा बदलले नाही त्यामुळे हे खांब वाकल्या गेले आहे. बहुतांश ट्रान्सफार्मर चे बॉक्स बदलण्यात आलेले नाही. अनेक बॉक्सचे दारे उघडे असतात. यातून अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढण्यात आले.

लोकप्रतिनिधीच्या उदासीनतेने तालुक्यात एक हि उपकेंद्र स्थापन झालेले नाही. त्यामुळे वणी आणि पांढरकवडा येथून विद्युत पुरवठा करण्यात येतो. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधिनी लक्ष देऊन तालुक्यात 220 के.व्ही. उपकेंद्राची उभारणी करावी. पावसाळा तोंडावर असताना महावितरण कडून देखभाल दुरुस्तीची कामे अद्याप सुरू करण्यात आले आहेत. याचा फटका सर्वसामान्य जनतेच्या दैनदिन जीवनावर आणि व्यवहारावर होत आहे.

बोगस बियाणे आणि साठवणूक
तालुक्यातील शेतकर्‍यांना रासायनिक खते आणि बी बियाणे मिळवण्यासाठी मोठी अडचण होत आहे. खते बी-बियाणे रासायनिक खते मिळवण्यासाठी कृषी केंद्र संचालक विद्राव्य खते किंवा इतर खते घेतल्याशिवाय रासायनिक खते बी बियाणे देत नाही. तर बियाण्यांच्या बाबतींत लिंकिंग करीत आहे. गेल्या वर्षी खतांचा काळाबाजार होत नव्हता. बियाण्यांचा काळाबाजार रासायनिक खते शेतकर्‍यांना मिळत नाही. रासायनिक खताबरोबर कृषी केंद्र संचालन कृषी अधिकार्‍याच्या आशीर्वादाने पिल्लू नावाची योजना आखली आहे.

खरीप हंगामाच्या पेरणी करिता शेतकऱ्यांद्वारे मोठ्या प्रमाणात बियाण्याची खरेदी चालू असताना काही कृषी केंद्र चालक हे विशिष्ट वाणाची बियाणे साठवणूक करून जादा दराने शेतकऱ्यांना पुरवत असल्‍याचे राजु उंबरकर यांनी स्‍पष्‍ट केले आहे. याप्रकरणी मनसेच्‍या वतीने स्टिंग ऑपरेशन करून हा सर्व प्रकार उघडकीस आणल्‍या जाईल आणि कृषी विभागाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा ईशारा मनसेने दिला आहे.
Rokhthok News