Home Breaking News धसका…भाजप “कन्फ्युज”, उमेदवारी करिता “सर्व्हे”

धसका…भाजप “कन्फ्युज”, उमेदवारी करिता “सर्व्हे”

● लोकसभेतील दारुण पराभवानंतर सतर्कता ● Elective Merit उमेदवारांचा शोध

1121
C1 20240622 09500513

लोकसभेतील दारुण पराभवानंतर सतर्कता
Elective Merit उमेदवारांचा शोध

Political News : सुनील पाटील |
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला. तब्बल दोन लाख साठ हजाराच्या फरकाने नवख्या उमेदवाराला मतदारांनी पसंती दर्शवली. तगड्या उमेदवारांचा झालेला पराभव भाजपला जिव्हारी लागला असून विधानसभा निवडणुकीत ‘कुणबी’ उमेदवाराला प्राधान्य द्यायचे का ? असा मतप्रवाह होत असलेल्या सर्व्हेक्षणातुन दिसत आहे. लोकसभेतील पराभवानंतर सतर्कता बाळगण्यात येत आहे. भाजप “कन्फ्युज” असल्याचे दिसत असले तरी Elective Merit उमेदवारांचा शोध घेण्यात येत आहे. Although the BJP seems to be “confused”, Elective Merit candidates are being sought.

राज्यातील सर्वच राजकीय पक्षाने “व्हिजन असेंम्बली” अवलंबले आहे. तोडफोड-फोडफाड करून सुध्दा अपेक्षित यश न मिळाल्याने भाजप सतर्कता बाळगत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व भाजपची महायुती विधानसभा निवडणुकीत एकत्रित निवडणुका लढवतील का हाच खरा प्रश्न आहे. त्याप्रमाणेच अतिवाढलेल्या आत्मविश्वासमुळे काँग्रेस पक्ष “एकला चलो रे” ची भूमिका वठवणार का हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

वणी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून भाजप चा दावा प्रबळ आहे. तर महाविकास आघाडीच्या वतीने ही जागा काँग्रेसला मिळणार की शिवसेना UBT गटाला हे अद्याप निश्चित झाले नाही. संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभेची एकमेव जागा शिवसेना UBT गटाला सुटेल अशी चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. परंतु पक्षांतर्गत सुरू असलेल्या कुरघोडीमुळे पक्ष प्रमुख नेमका काय निर्णय घेतात हे कालांतराने स्पष्ट होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत वणी विधानसभेतून काँग्रेसच्या उमेदवाराला अनपेक्षित “लीड” मिळाला. या पराभवाची कारणमीमांसा भाजप करताहेत. विद्यमान आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्याबाबत नकारात्मकता नाही, मात्र फ्रेश चेहरा व विधानसभा निवडणुकीत जातीय समीकरण लक्षात घेता चाचपणी सुरू आहे. सर्व्हे करणाऱ्या टीम शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांची मते जाणून घेत असतानाच त्यांना मतदारसंघाची खडानखडा माहिती असल्याचे जाणवत आहे.

विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना डावलने शक्य नाही तरी सुद्धा भाजप पक्षश्रेष्ठी सहकार क्षेत्रातील विनायक एकरे यांच्याबाबत चाचपणी करताहेत. तर माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, विजय पिदूरकर यांच्या बाबत सर्व्हेक्षण करणारे प्रामुख्याने विचारणा करताहेत. काँग्रेसच्या बाबतीत संजय खाडे यांच्या नावाची जोरदार चर्चा होत असतानाच वामनराव कासावर, राजीव कासावर, अरुणा खंडाळकर व टीकाराम कोंगरे यांच्याबाबत मतदारांचे मत जाणून घेतल्या जात आहे. शिवसेना UBT कडून उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, संजय देरकर व माजी आमदार विश्वास नांदेकर यांची पार्श्वभूमी सर्व्हेक्षण करणारे पथक काटेकोरपणे तपासत आहे.
ROKHTHOK NEWS