Home Breaking News त्याच त्या…चेहऱ्याची मतदारांना “अलर्जी”

त्याच त्या…चेहऱ्याची मतदारांना “अलर्जी”

● लोकसभेत नवखे उमेदवार विजयी ● विधानसभेत सुद्धा नव्या नेतृत्वाची गरज

1258
C1 20240624 08382343

लोकसभेत नवखे उमेदवार विजयी
विधानसभेत सुद्धा नव्या नेतृत्वाची गरज

Political News : सुनील पाटील | नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नव्या दमाच्या तरुण उमेदवारांना मतदारांनी पसंती दर्शवली. त्याच त्या… चेहऱ्याची मतदारांना अलर्जी असल्याचे प्रामुख्याने दिसून आले. विधानसभेत सुद्धा राजकीय पक्षाने तरुण तडफदार चेहऱ्यांना संधी देण्याची गरज निर्माण झाली आहे. There has been a need for the political party to give opportunities to the young hot faces.

लोकसभा असो की विधानसभा प्रत्येकवेळी निवडणुकीच्या रिंगणात उडी मारायची, जिंकू किंवा पराभूत होऊ आपली दावेदारी कायम ठेवायची असा इतिहास अनेकांचा आहे. खासदारकी तथा आमदारकी मिळाली की मतदारसंघाचा मालक असल्याचा भास अनेकांना होतोय. त्यांना या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी धूळ चारली आहे. अनेकांचे बालेकिल्ले नवख्यानी उध्वस्त केले आहे.

“भाकरी फिरवावी लागते, अन्यथा ती करपते” त्या प्रमाणेच राजकीय पक्षाने सुद्धा विधानसभा निवडणुकीत अनेकदा निवडणुका लढवणाऱ्या त्याच त्या उमेदवारांना रिंगणात न उतरवता नवख्याना संधी द्यायला हवी. लोकसभेतील उदाहरण बघितल्यास रामदास तडस, अशोक नेते, सुनील मेंढे, रावसाहेब दानवे, विनायक राऊत, संजय काका पाटील, प्रताप पाटील चिखलीकर, राहुल शेवाळे, नवनीत राणा, पंकजा मुंडे, भारती पवार, कपिल पाटील आणि बऱ्याच दिग्गजांचा नवख्यानी पराभव केला आहे.

अवघ्या काही महिन्यावर विधानसभेच्या निवडणूका येऊन ठेपल्या आहेत. सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांची चाचपणी करताहेत. महायुती व महाविकास आघाडीत तुल्यबळ लढती होणार आहे. मतदारांची पसंती नवखे उमेदवार असल्याचे लोकसभेतील विजयाने सिद्ध झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी (SP) व शिवसेना (UBT) यांनी निवडणूक रिंगणात उतरवलेल्या नवख्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. विधानसभेत सुद्धा नवख्यानां संधी दिल्यास चित्र बदलणार असे सध्यस्थीतीत दिसत आहे.
ROKHTHOK NEWS