Home Breaking News “मनसे” विधानसभा निवडणूका लढणारच..!

“मनसे” विधानसभा निवडणूका लढणारच..!

● मनसे नेते राजू उंबरकर असेल रिंगणात ● महायुतीला बसणार मत विभाजनाचा फटका

1105
C1 20240626 00343748

मनसे नेते राजू उंबरकर असेल रिंगणात
महायुतीला बसणार मत विभाजनाचा फटका

Political News | सुनील पाटील | लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेता सर्वच राजकीय पक्ष विधानसभेकरिता मोजून मापून पावले टाकताहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीत “बिनशर्त” पाठिंबा दिला होता मात्र आता भाजप सापत्न वागणूक देत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. यामुळे मनसेने “एकला चलो रे” ची भूमिका अवलंबल्याची गोपनीय माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली असून विधानसभेच्या तब्बल 235 जागा लढवणार असल्याचे समजते. “MNS” will contest assembly elections

लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पक्षप्रमुखांच्या या अनपेक्षित निर्णयाने संपूर्ण महाराष्ट्रातील मनसेचे कार्यकर्ते पक्षादेश समजून कामाला लागले. मनसे मुळे मविआचे पाच ते सात उमेदवार लोकसभेत पराभूत झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. मुंबई आणि कोकणात याचा फटका बसल्याचे खाजगीत बोलल्या जात आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजप सर्व सामर्थ्यपणाला लावणार आहे. येनकेन प्रकारे निवडणूक लढवायचीच आणि जिंकायचीच असा पावित्रा अवलंबलेला असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्र रणसंग्रामात उतरणार असल्याचे बोलल्या जात आहे. मनसेच्या भूमिकेमुळे मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार हा अजिबातच संशोधनाचा विषय नाही.

वणी विधानसभा मतदारसंघात मनसेने चांगले वलय निर्माण केले आहे. मनसे नेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात संपूर्ण मतदारसंघात सातत्याने विविध समाजपयोगी, सर्वसमावेशक उपक्रम राबविण्यात येतात. दिन- दुबळ्याना आर्थिक मदत, आरोग्यसेवेचा ध्यास घेत मागील पंधरा वर्षापासून आरोग्यसेवा केंद्र चालविण्यात येत आहे. निवडणुकीतील हार-जीत याला महत्व न देता सदोदित आडल्या- नडलेल्यांच्या मदतीला धावून जाण्याचे धाडस केवळ राजू उंबरकर यांच्यातच आहे.

विधानसभेची निवडणूक अतिशय तुल्यबळ होणार असल्याचे संकेत मिळत आहे. लोकसभेत झालेला दारुण पराभव अनेकांची झोप उडवणारा आहे. युती व आघाडीत होणाऱ्या संभाव्य लढतीत ट्विस्ट निर्माण झाला असून मनसेची “एन्ट्री” वेगळीच दिशा आणि दशा ठरवणारी असणार आहे.
Rokhthok News