● वणी मतदारसंघावर काँग्रेसचा दावा..!
Political News: Sunil Patil | विदर्भात लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला भरभरून प्रतिसाद दिला. अनपेक्षित result मिळताच आत्मविश्वास वाढल्याने काँग्रेस पक्ष हक्काची जागा सोडण्यास तयार नाही. मविआच्या जागा वाटपात वणी मतदारसंघ मिळावा याकरिता अंतर्गत मतभेद विसरून काँग्रेसी नेते एकवटले. पक्षश्रेष्ठींना पूर्वतिहास अवगत करत मतदारसंघावर Strongly दावा करण्यात येणार आहे. Forgetting internal differences, Congress leaders united.
वणी विधानसभा मतदारसंघ काही काळाचा अपवाद वगळता पूर्वापार काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या मतदारसंघात कम्युनिस्ट, शिवसेना व अपक्ष उमेदवारांनी एकेकदा विजय मिळवला आहे. 2014 च्या निवडणुकीत मात्र भाजपने काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावत सलग दोनदा विजय मिळवला आहे.
महाविकास आघाडी, महायुती व महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी तिरंगी लढत वणी विधानसभेत होण्याचे संकेत सध्यस्थीतीत दिसत आहे. महाविकास आघाडी झाल्यास हा मतदारसंघ काँग्रेसला सुटणार की शिवसेना उबाठा गटाला याबाबत तर्क-वितर्क लढवल्या जात आहे. त्यातच कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी “उमेदवारी कोणालाही द्या, मात्र मतदारसंघ कॉंग्रेसलाच सोडा” असे साकडे पक्षश्रेष्ठींना घातल्याचे बोलल्या जात आहे.