Home Breaking News मोफत भरल्या जातील लाडकी बहिण योजनेचे फॉर्म

मोफत भरल्या जातील लाडकी बहिण योजनेचे फॉर्म

● आ. बोदकुरवार यांचा उपक्रम

598
C1 20240708 08423194

आ. बोदकुरवार यांचा उपक्रम

Wani News | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे नोंदणी फॉर्म भरण्याची लगबग सुरु आहे. अनेक महिलांना अडचणींचा सामना करावा लागतोय यामुळे आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या संकल्पनेतून शहरातील विविध ठिकाणी लाडकी बहिण योजनेचे फॉर्म मोफत भरल्या जाणार आहे. हा उपक्रम सोमवार दिनांक 8 जुलै पासून सुरू होणार आहे. the concept of Sanjeevreddy Bodkurwar, the forms of Ladaki Bahin Yojana will be filled free of charge at various places in the city.

वणी शहरातील बसस्टॉप समोर, टिळक चौक, दिपक चौपाटी, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान जवळ, इंगोले मेडिकल जवळ, राम शेवाळकर परिसर या ठिकाणी लाडकी बहिण योजनेचे नोंदणी फॉर्म भरून देण्यात येणार आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व पात्र महिला भगिनींनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्याकरिता वरील ठिकाणी आपला फॉर्म निःशुल्क भरून घ्यावा असे आव्हान आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले आहे.

लागणारे आवश्यक कागदपत्र
अधिवास प्रमाणपत्र किंवा 15 वर्षापुर्वीचे रेशन कार्ड/ मतदार ओळखपत्र / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / जन्म दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र (2.50 लाख उत्पन्न मयदिपर्यंतेचे) किंवा पिवळे / केशरी रेशन कार्ड , परराज्यातील जन्म झालेली महिला असल्यास किंवा महाराष्ट्रातील पुरुषासोबत विवाह झाला असल्यास 1) पतीचा जन्म दाखला, 2) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 3) अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे. यासोबत बँक खात्याच्या पासबूकची पहिल्या पानाची छायांकीत पत्र, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो आवश्यक आहे.
Rokhthok News