Home Breaking News युवकाची विष प्राशन करून आत्महत्या

युवकाची विष प्राशन करून आत्महत्या

● मेंढोली येथील घटना

1542
C1 20240710 17035208

मेंढोली येथील घटना

Sad News | तालुक्यातील मेंढोली येथे वास्तव्यास असलेल्या 34 वर्षीय युवकाने विष प्राशन करून आपले आयुष्य संपवले. ही घटना बुधवार दिनांक 10 जुलै ला सकाळी उघडकीस आली. A 34-year-old youth ended his life by consuming poison.

राकेश नथुजी उलमाले (34) असे मृतकाचे नाव आहे. तो आपल्या परिवारासह मेंढोली येथे वास्तव्यास होता. घटनेच्या दिवशी सकाळी त्याने आपल्या घरीच विषाचा घोट पोटात रिचवला. ही बाब घरच्या मंडळींना लक्षात येताच त्यांनी राकेशला रुग्णालयात आणत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

राकेश हा मद्याच्या आहारी गेल्याचे बोलल्या जात आहे. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्याचे पश्चात 3 वर्षाची मुलगी असून पत्नी, वडील असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने उलमाले कुटुंबावर मोठें संकट ओढवले आहे. याप्रकरणी पुढील तपास शिरपूर पोलीस करताहेत.
Rokhthok News