Home Breaking News पालिकेची लक्तरे चव्हाट्यावर, मनसेने केला पर्दाफाश

पालिकेची लक्तरे चव्हाट्यावर, मनसेने केला पर्दाफाश

● दूषित पाण्याचा होतोय पुरवठा ? ● वणीकरांचे डोळे विस्फारणारा VDO ● लोकप्रतिनिधीचे डोळे कधी उघडणार !

623
C1 20240721 18210752

 दूषित पाण्याचा होतोय पुरवठा ?
वणीकरांचे डोळे विस्फारणारा VDO
लोकप्रतिनिधीचे डोळे कधी उघडणार !

MNS NEWS : धक्कादायक आणि वणीकरांचे डोळे विस्फारणारा VDO मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी त्यांच्या फेसबुक वॉल वरून प्रसारित केला आहे. वणीकरांना होत असलेला पाणी पुरवठा किती दूषित व धोकादायक आहे, संबंधित यंत्रणेवर याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करणे अभिप्रेत असताना प्रशासन मुगगिळून गप्पगुमान आहे. तर लोकप्रतिनिधींचे डोळे कधी उघडणार असा संतप्त सवाल मनसे चे नेते राजू उंबरकर यांनी सोशल मीडियातून उपस्थित केल्याने पालिकेची लक्तरे चव्हाट्यावर आली आहे. MNS leader Raju Umbarkar’s comment on social media has brought the municipal government to the fore.

वणी शहरात होत असलेला पाणी पुरवठा अतिशय दूषित व आरोग्यासाठी अपायकारक असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांनी समाज माध्यमातून केला आहे. त्यांच्या “टीम”ने चक्क जीवनदायिनी निर्गुडेत लगतच्या लेआऊट मधील सांडपाणी व सार्वजनिक सांडसाचे आउटलेट थेट निर्गुडा नदीत सोडण्यात येत असल्याचा VDO प्रसारित केल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.

जलप्रदूषण म्हणजे पाण्याच्या विविध स्रोतांचे प्रदूषण होय. जलप्रदूषण ही एक मानवनिर्मित समस्या आहे. माणसाच्या तीन गरजांपैकी पाणी ही दुसऱ्या क्रमांकाची गरज आहे. आपल्याला स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रदुषित पाण्यामुळे पोटाचे विकार आणि इतर बरेचसे रोग होतात. पाणी प्रदूषित होण्याची अनेक कारणे आहेत आणि याला संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था जबाबदार आहेत.

पाण्यात विशिष्ट गुणधर्मांचे पदार्थ अश्या प्रमाणात मिसळतात की, त्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बदल होऊन ते वापरण्यास अयोग्य ठरते. जलप्रदूषणामुळे सजीवांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात किंवा पाण्याची चव बिघडते, ते घाणेरडे दिसते वा दुर्गंधीयुक्त होते. या पाण्याला प्रदूषित जल म्हणतात. पाण्याचे प्राकृतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म बदलल्याने मानव व इतर सजीवांवर अपायकारक परिणाम करणारी जल प्रदूषण ही प्रक्रिया आहे. नैसर्गिक पाण्यात एखादा बाह्य पदार्थ यांची भर पडल्यास ते पाणी प्रदूषित होऊन त्याचा मानव, इतर प्राणी आणि जलीय जीव यांना अपाय होतो.

रोगराईला आपसूकच आमंत्रण मिळणारे हे पावसाळ्याचे दिवस आहे, पालिकेने सतर्क असणे गरजेचे आहे. शहराला होत असलेला पाणी पुरवठा शुद्ध दर्जाचा होतोय का हे तपासणे अनिवार्य आहे. मुख्याधिकारी यांनी संबंधित कंत्राटदारांची कानउघाडणी करणे गरजेचे आहे. होत असलेला पाणी पुरवठा शुद्ध की अशुद्ध याची चाचणी नियमित करणे अभिप्रेत आहे. कागदोपत्री चाचणी होत असेल तर आपण खरे गुन्हेगार असल्याचे सिद्ध होणार आहे.
ROKHTHOK NEWS