Home Breaking News नवख्यांच्या दावेदारीने प्रस्थापितांना “धक्का”

नवख्यांच्या दावेदारीने प्रस्थापितांना “धक्का”

● पक्षश्रेष्ठींसमोर निर्माण होणार पेच

905
C1 20240723 13500016

पक्षश्रेष्ठींसमोर निर्माण होणार पेच

Political News : सुनील पाटील | विधानसभेच्या निवडणुका तुल्यबळ होणार असल्याचे संकेत मिळताहेत. सर्वच राजकीय पक्ष ताकही फुंकून पिताहेत, यामुळे Elective Merit उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहे. काँग्रेस, शिवसेना (उबाठा) व भाजपच्या बलाढ्य असलेल्या नवख्यानी उमेदवारी साठी दावेदारी केली आहे. यामुळे पक्षश्रेष्ठींसमोर पेच निर्माण होणार असला तरी प्रस्थापितांना मात्र “धक्का” बसणार आहे. Elective Merit candidates will be in the election fray.

महाविकास आघाडीच्‍या जागा वाटपात वणी विधानसभा मतदारसंघ कोणाच्‍या वाट्याला जाणार याबाबत आद्यप स्पष्टता नाही. काँग्रेस व शिवसेना (उबाठा) या दोन्ही पक्षांनी दावेदारी केली आहे, मात्र निकष काय असणार हे गुलदस्त्यात आहे. तरी सुद्धा दोन्ही पक्षाच्या नवख्या चेहऱ्यानी जबर “फिल्डिंग” लावत पक्षाकडे दावा ठोकला आहे.

काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार यांचे मतदारसंघावर वर्चस्व राहिलेले आहे. मात्र त्याच त्या चेहऱ्यांना मतदार कंटाळला आहे. प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी दाखल करायची हा “फंडा” आता कालबाह्य झाला आहे, मतदारांनी लोकसभा निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत सुध्दा नवख्यांची लॉटरी लागेल असे दिसत आहे.

काँग्रेस पक्षाकडून जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांनी प्रबळ दावा केला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांचा कौल मिळाल्यास उमेदवारी बाबत अडचण येणार नाही. तर शिवसेना (उबाठा) कडून माजी आमदारांसह तिघांनी दावेदारी केली आहे. निवडून येण्याची क्षमता कोणत्या उमेदवाराची आहे हे तपासल्या जाणार असून उप जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांना संधी मिळेल अशी चर्चा वरिष्ठ पातळीवर होत आहे. मात्र हा मतदारसंघ काँग्रेस किंवा शिवसेना (उबाठा) नेमकं कोणाच्या वाट्याला जाणार यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सलग दोनवेळा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे, ते विद्यमान आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराला मतदारसंघात मिळालेले मताधिक्य बघता Anti Incumbency चा फटका बसू नये यासाठी पक्ष सतर्क आहे. त्यातच भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य विजय चोरडिया यांनी पत्रपरिषद घेत उमेदवारीसाठी रणशिंग फुंकले आहे. पक्षश्रेष्ठीं जो निर्णय घेईल तो मान्य असेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

विधानसभा निवडणुकीत निवडून येण्याची पात्रता या तिन्ही नवख्या दावेदारात आहे. सामाजिक, सर्वसमावेशक उपक्रम राबविण्यात यांचा हातखंडा आहे. सतत जनहिताचे कार्य करत असल्याने उमेदवार म्हणून त्यांना मतदारांची पसंती मिळणार का हे बघणे औत्सुक्याचे आहे. विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष नेमकी कोणती रणनीती आखणार, उमेदवार कोण असेल, त्याकरिता कोणते समीकरण असणार हे काही कालावधीनंतर स्पष्ट होणार आहे.
Rokhthok News