● वीस वर्ष सश्रम कारावास
Crime News | घटनेच्या दिवशी अल्पवयीन बालिकेची आई रोजमजुरीला तर वडील वाहन चालक असल्याने कामावर निघून गेले. अशातच पिडीता एकटीच घरी खेळत असतांना 39 वर्षीय नराधम आरोपीने लैंगिक अत्याचार केला. याबाबत शिरपूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तत्पर तपास करत प्रकरण न्याय प्रविष्ट केले. न्यायालयाने आरोपीला 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. The court sentenced the accused to 20 years rigorous imprisonment.
कवडु दौलत बोबडे (39) नायगाव (बु) ता. वणी असे नराधम आरोपीचे नाव आहे. शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घृणास्पद घटना घडली. सात वर्षीय पीडित बालिका घरी एकटीच खेळत होती. अशातच आरोपी तिथे आला व पिण्यास पाणी मागितले. पिडीतेने त्यास पाणी आणुन दिले. पाणी पिल्यानंतर आरोपीने पिडीता हिस कडेवर उचलुन घेतले व घरासमोरील न्हानी घरात नेवुन तिचेवर लैंगिक अत्याचार केला.
आई-वडील घरी परतल्यानंतर पीडित बालिकेने घडलेली घटना सांगितली. पिडीतेला त्रास होत असल्याने तिला प्राथमीक आरोग्य केंद्रात नंतर घुग्गूस येथील डॉ. दास यांचे दवाखान्यात व शेवटी चंद्रपुर येथील सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले. पीडितेचे कुटुंबीय हादरून गेले होते. याप्रकरणी शिरपूर पोलिसात रीतसर तक्रार नोंदविण्यात आली.
शिरपूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वरं धावळे यांनी गुन्ह्याचा सखोल तपास करुन न्यायालय पांढरकवडा येथे दोषारोप पत्र दाखल केले. अभीयोग पक्षातर्फे सदरहु खटल्यात सहा. अभियोक्ता प्रशांत मानकर यांनी एकुण 10 साक्षीदार तपासले व त्यामध्ये पिडीता पिडीतेची आई, व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली.
अभियोग पक्षातर्फे सादर करण्यात आलेले पुरावे व युक्तीवाद ग्राह्य धरुन विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश- एक, केळापूर यांनी आरोपी कवडु दौलत बोबडे, यास 20 वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने अतिरीक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सोबतच पिडीतेला रुपये 5000 नुकसान भरपाई देण्याचा आदेश पारित करण्यात आला आहे.
अभीयोग पक्षातर्फे सदरहु खटल्यात प्रशांत मानकर सहा. सरकारी अभियोक्ता यांनी खटला चालविला व पैरवी अधिकारी म्हणुन सहा.पो.उप.नि शिवदास गादेकर व ना.पो. का आशिष टेकाडे यांनी कामकाज पाहिले. आरोपी तर्फे ऍड. वंदना लोढा व ऍड. सिध्दार्थ लोढा यांनी कामकाज चालविले.
Rokhthok News