Home Breaking News संसदेत शेतकरी आत्महत्येवर खा. धानोरकर “कडाडल्या”

संसदेत शेतकरी आत्महत्येवर खा. धानोरकर “कडाडल्या”

● सरकारने दिलेल्या आश्वासनाची केली चिरफाड

899
C1 20240724 23223128
Img 20241016 Wa0023
सरकारने दिलेल्या आश्वासनाची केली चिरफाड

Political News : सुनील पाटील | बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी म्हण प्रचलित आहे त्याचा प्रत्यय संसदेच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात आला. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेच्या खा. प्रतिभा धानोरकर यांनी मोदी सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची चिरफाड केली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेचे लक्ष वेधत उद्योग मित्रांच्या पाठिशी असलेले मोदी सरकार शेतकरी विरोधी असल्याचा थेट हल्ला चढवला. MP Dhanorkar lashed out at farmers suicide in Parliament

लोकसभेच्या शून्य तासात मतदारसंघातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित करून आपल्या पुढील वाटचालीची चुणूक खा. धानोरकर यांनी दाखवली. त्यांनी, प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून थेट हल्ला चढवला. लोकसभा क्षेत्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवराबाबत केंद्र शासन उदासीन असल्याचे स्पष्ट करत ‘2014 मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करु’ असे सांगणारे सरकार शेतकरी हिताचे नसल्याचा “घणाघाती” आरोप केला.

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात मागील पाच वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात 444 तर यवतमाळ जिल्ह्यात 1641 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यातील चंद्रपूर जिल्ह्यात 319 तर यवतमाळ जिल्ह्यात 775 शेतकरी आत्महत्या पात्र ठरविण्यात आल्या आहेत. यावर ठोस निर्णय न घेणारे मोदी सरकार हे उद्योजकांचे असून शेतकरी विरोधी असल्याचे स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी सरकारने कायमस्वरूपी उपाययोजना आखाव्यात असे ठणकावून सांगितले.
ROKHTHOK NEWS