Home Breaking News ग्रामस्थ आक्रमक, आमदाराची जबर खरडपट्टी

ग्रामस्थ आक्रमक, आमदाराची जबर खरडपट्टी

● अशुद्ध पाणी पिण्यास आमदारांचा नकार

1046
C1 20240726 22220280

अशुद्ध पाणी पिण्यास आमदारांचा नकार

Political News : सुनील पाटील | दीड वर्षापासून ग्रामस्थ दूषित पाणी पीत होते. त्रस्त ग्रामस्थांनी थेट आमदारांचे कार्यालयात धाव घेतली. दूषित, अशुद्ध पाणी पिणाऱ्या ग्रामस्थांनी चक्क ते पाणी आमदाराला पिण्याची गळ घातली. ग्रामस्थ आक्रमक झाले होते त्यांनी आमदाराला जबर शाब्दिक फटकारले आणि चांगलीच खरडपट्टी काढली. ही घटना प्रचंड व्हायरल होत असून भाजपा आमदारांची कार्यप्रणाली चव्हाट्यावर आली आहे. Villagers drinking contaminated, impure water actually forced the MLA to drink that water.

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव मतदारसंघात असलेल्या कोच्ची येथील ग्रामस्थ गेल्या दीड वर्षांपासून दूषित अशुद्ध पाणी पित आहेत. याबाबत गावकऱ्यांनी अनेकदा पाण्याचे नमुने घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना दिले. महायुती सरकारच्या काळात बेशिस्त आणि निगरगट्ट झालेली सरकारी यंत्रणा कुंभकर्णी झोपेत आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावांतील पाण्याचे नमूने दूषित आले आहेत. भाजपचे आमदार, महायुतीचे मंत्री या जिल्ह्यात असताना ही भयावह अवस्था ! ग्रामस्थ अनुभवताहेत. “हर घर नल और नल में जल” ही घोषणाच फोल ठरताना दिसत असून ‘हर नल के जल में मल‘ हा नारा सत्यता दर्शवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

राळेगाव मतदारसंघातील ग्रामस्थांनी आमदार अशोक उईके यांचे कार्यालय गाठले. आक्रमक ग्रामस्थांनी सोबत आणलेला पाणी पुरवठा योजनेतील पाण्याचा नमुना सोबत आणला होता. दीड वर्षांपासून ते पीत असलेले पाणी आमदारांना पिण्यास सांगितले, आमदारांची तारांबळ उडाली. ग्रामस्थ तसेच कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाल्याचे चित्रफितीतून दिसून आले. हीच परिस्थिती बहुतांश मतदारसंघात आहे.

“भाजप कार्यकर्ता म्हटलं तर लोकं जोडे मरतील..!
व्हायरल होत असलेल्या चित्रफितीतून ते मतदारसंघातील ग्रामस्थ होते की भाजप कार्यकर्ते, हे स्पष्ट होत नसले तरी ते जे बोलले ते भारतीय जनता पार्टीला विचारमंथन करायला लावणारे आहे. लोकप्रतिनिधींनी अधिकारी व कंत्राटदारांची बाजू न घेता मतदारांचा सुद्धा विचार करणे गरजेचे आहे. मात्र सर्वत्र कंत्राटदारांचीच चलती असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे.
Rokhthok News

( व्हायरल चित्रफितीची पुष्टी “रोखठोक” करत नाही )