● कायर येथील घटना
Sad News | कायर येथील निवासी असलेल्या 58 वर्षीय इसमाने विष प्राशन केले. ही बाब घरच्या मंडळींना कळताच त्यांनी तडकाफडकी वणीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही घटना शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट ला दुपारी पाच वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. 58-year-old man, a resident of kayar, consumed poison.
शंकर रामभाऊ कावडे (58) असे मृतकाचे नाव आहे. ते कायर येथे आपल्या परिवारासह वास्तव्यास होते. त्यांनी दुपारी चार ते पाच वाजताच्या दरम्यान विषारी द्रव प्राशन केले. त्यांच्या प्राकृतिक हालचालींवरून घरच्यांना ही बाब कळली. त्यांनी तात्काळ रुग्णालयात हलवले. मात्र तो पर्यंत त्यांनी देह त्यागला होता. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
Rokhthok News