Home Breaking News चक्काजाम, वाहतूक खोळंबली, ग्रामस्थ संतप्त

चक्काजाम, वाहतूक खोळंबली, ग्रामस्थ संतप्त

● कुंड्रा- पुरड रस्त्याची दयनीय अवस्था ● सुधाकर गोरे यांच्या नेतृत्वात आंदोलन

494
C1 20240810 11164562

कुंड्रा- पुरड रस्त्याची दयनीय अवस्था
सुधाकर गोरे यांच्या नेतृत्वात आंदोलन

Wani News | रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी ही मागणी शिवसेना उप जिल्हाप्रमुख सुधाकर गोरे यांनी SDO यांना निवेदनातुन केली होती. मात्र प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याने अखेर ग्रामस्थांनी सुधाकर गोरे यांच्या नेतृत्वाखाली कुंड्रा परिसरात शनिवारी सकाळी चक्काजाम केला असून वाहतूक खोळंबली आहे. Traffic has been disrupted on Saturday morning.

उपविभागात ओव्हरलोड अवजड वाहनाचे दळणवळण यामुळे रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे. स्थानिक ग्रामस्थांना नाहक यातना सहन कराव्या लागत आहे. तर लहानसहान अपघात नित्याचे आहे. कुंड्रा, कृष्णानपूर, मोहदा, वेळाबाई येथील विद्यार्थी, विद्यार्थिनीं, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, रुग्ण यांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.

परिसरात अनेक खनिजांच्या खाणी आहेत, माणिकगड, RCPL, अंबुजा, दालमिया, येलांती आदी उद्योग समूहातील कच्चा व पक्क्या मालाची अवजड वाहनातून होणारी ओव्हरलोड वाहतूक रस्त्याच्या दयनीय अवस्थेला कारणीभूत ठरते आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने गोरे यांनी केली होती. मात्र प्रशासन लक्ष देत नसल्याने चक्काजाम आंदोलनाचे अस्त्र उगारावे लागले.
Rokhthok News