Home Breaking News युवकांना मनसेच्या विचारधारेचे आकर्षण

युवकांना मनसेच्या विचारधारेचे आकर्षण

● शेकडो तरुण मनसेत दाखल

545
C1 20240812 13513678

शेकडो तरुण मनसेत दाखल

MNS NEWS | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेशाकरिता तरुणाईत चांगलीच चढाओढ दिसून येत आहे. महाराष्ट्रातील युवकांना मनसेच्या विचारधारेचे आकर्षण वाटू लागल्यामुळे ते पक्षात सामील होत आहेत. वणी शहरातील शेकडो युवकांनी पक्षनेते राजू उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला आहे. Hundreds of youths have entered the prominent presence of party leader Raju Umbarkar.

मागील काही वर्षांपासून मनसे नेते राजू उंबरकर सातत्याने समाजपयोगी, सर्वसमावेशक उपक्रम राबवताहेत. मतदारसंघात पक्षाने झंझावात निर्माण केला आहे. विधानसभा क्षेत्रातील तिन्ही तालुक्यात तरुण, तरुणी व महिलावर्ग मनसेत सक्रिय सदस्यत्व स्वीकारताहेत. विविध क्षेत्रांतील युवकांनी मनसेत आपली निष्ठा दाखवली आहे. तर नव्याने मनसेत दाखल होणाऱ्यांचे उंबरकर यांनी स्वागत केले आणि पक्षाच्या ध्येयधोरणांना समर्पित राहण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्रातील युवकांमध्ये प्रचंड ताकद आहे, आणि ही ताकदच राज्याच्या विकासासाठी महत्त्वाची ठरणार आहे. मनसे युवकांना संधी देऊन त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे, ज्यामुळे ते राज्याच्या विकासात सक्रिय भूमिका निभावू शकतील. तरुणांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्याची ताकद केवळ पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यातच आहे यामुळे तरुणाई मनसे कडे आकर्षित होत असून त्यांचे उज्वल भविष्य साकारण्यासाठी मनसे कटिबद्ध आहे.
राजू उंबरकर
मनसे नेता, वणी

याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहर उपाध्यक्ष मयूर गेडाम, विलन बोदाडकर, विठ्ठल हेपट, आकाश काकडे, सचिन बोढे, हिरा गोहोकार, विजय चोखारे, नरेश शेंडे, मयूर पिदूरकर, बादल धांडे, आशिष बोबडे, मनोज बघवा, प्रतीक गौरकार, अनिकेत चिकटे, गणेश गोहोकार, नीरज बोरकुटे, राजू चौधरी, राजू विचू, निखिल खाडे, मंगेश ढेंगळे, हिमांशू बोहरा, सुरज काकडे, धीरज बघवा पदाधिकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ROKHTHOK NEWS