● अवैध दारु विक्रीचा प्रश्न ऐरणीवर
● महिला व पुरुषांवर गुन्हे दाखल
Wani News | मंदर शिवारात महामार्गालगत असलेल्या धाब्यावर अवैधरित्या दारु विक्री होत असल्याची कुणकुण ग्रामस्थांना लागली होती. त्या विरोधात मंदर येथील महिला एकवटल्या आणि मंगळवारी सकाळी धाब्यावर हल्लाबोल करत धाबा पेटवून दिला व धाबाचालकाला मारहाण केली. अवैध दारु अड्डा उध्वस्त करणे ग्रामस्थांना चांगलेच भोवले असुन तक्रारीअंती सात ते आठ जणावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. Attacking the dhaba, they set the dhaba on fire and beat up the dhaba driver
तालुक्यात माहामार्गालगत अनेकांनी धाबा टाकुन अवैध दारु विक्री करण्याचा सपाटा लावला आहे. खेडयापाडयात अवैध दारुचा महापुर ओसंडून वाहत आहे. पोलीस प्रशासन तसेच उत्पादन शुल्क विभाग यांचे होत असलेले दुर्लक्ष खऱ्याअर्थाने अवैध दारु विक्रीला चालणा देणारे ठरत आहे. मंदर शिवारातील धाब्यावर अवैध दारु विक्री होत असल्याचे पोलीस विभागाच्या निदर्शनांस आले नाही किंबहुना जाणीवपूर्वक कानाडोळा करण्यात आला का हा संशोधनाचा विषय आहे.
दिलीप सुरजप्रकाश ओझा (32) राहणार कोंडावार लेआउट असे धाबा चालकांचे नांव आहे. मंगळवारी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान मंदर येथील 40 ते 50 महिला व 20 ते 25 पुरुष धाब्या समोर आले. त्यावेळी धाबाचालक धाब्यामध्ये असलेल्या पलंगावर आराम करत होता. अचानक जमावाने धाब्याचा दरवाजा तोडून जबरीने आत प्रवेश केला. धाब्यातील साहित्यांची नासधुस केली तर लाठी काठीने जबर मारहाण करण्यात आली. यानंतर त्या संतप्त जमावाने धाब्याला पेटवून दिले. या घटनेत 3 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलीसांनी निलेश संतोष सातपुते, गोलु दुरुतकर, अश्विनी कपील आञाम, गजानन परसुटकर, भोला लोणारे, प्रमोद बोथले, कपील आञाम व अनोळखी एक असे 8 जणावर भारतीय न्याय संहिता कलम 189 (2), 191 (1), 191 (2), 191 (3), 119 (1), 326 (एफ), 115 (2), 324 (4), 324 (5), 351 (2), 352 अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. या घटनेत आरोपीच्या संख्येत वाढ होणार असल्याचे बोलल्या जात आहे.
Rokhthok News