Home Breaking News MNS | दहीहंडीचा थरार, उत्सुकता शिगेला

MNS | दहीहंडीचा थरार, उत्सुकता शिगेला

● महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भव्य आयोजन ● जय्यत तयारीला सरसावले महाराष्ट्र सैनिक

335
C1 20240829 17533608

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भव्य आयोजन
जय्यत तयारीला सरसावले महाराष्ट्र सैनिक

MNS NEWS | विदर्भात भव्यदिव्य स्वरूपात दहीहंडीचा उत्सव वणीत साजरा करण्यात येत आहे. “ढाक्कुमाक्कुम… टाक्कमाक्कुम.. बोल बजरंग बली की जय” चा जयघोष आणि गोविंदा पथकाचे थरारक मानवी मनोरे अंगावर शहारे आणणारे असते. शुक्रवारी 30 ऑगस्टला शासकीय मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून दहीहंडीचा थरार अनुभवता येणार आहे. One can experience the thrill of Dahi Handi through the concept of Maharashtra Navnirman Sena leader Raju Umbarkar.

राज्यभरात दहीहंडीचा उत्साह बघायला मिळतो, पुणे, ठाणे आणि मुंबईत दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो. आता राज्यभरात या उत्सवाची व्याप्ती वाढताना दिसत आहे. मनसे च्या वतीने वणी शहरात दहीहंडीचा भव्यदिव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हे दुसरे वर्ष असून विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून ख्याती प्राप्त केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजु उंबरकर यांच्या कडून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मागीलवर्षी मनसेच्या दहीहंडी कार्यक्रमांमध्ये मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांनी हजेरी लावली होती. यावेळी प्रसिद्ध नृत्यांगना तथा सिने तारका माधुरी पवार ही सेलिब्रिटी मनसेच्या दहीहंडी उत्सवाची रंगत वाढणार आहे.

मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून मनसे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे. नागपूर येथील बारस्कर यांची म्युझिक सिस्टीम असणार आहे. मोठया शहरातील गोविंदा पथकांना आमंत्रित करण्यात आले आहे. सेलिब्रिटींची वर्दळ आणि लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट केल्या जाणार आहे. तरी परिसरातील नागरिकांनी दहीहंडीचा थरार अनुभवावा असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.
ROKHTHOK NEWS