Home Breaking News Madhuri Pawar | महाराष्ट्राची अप्सरा, सिनेसृष्टीतील उभारता “सितारा”

Madhuri Pawar | महाराष्ट्राची अप्सरा, सिनेसृष्टीतील उभारता “सितारा”

● गरिबी, अपार कष्ट आणि नावलौकिक

493
C1 20240830 12052960

गरिबी, अपार कष्ट आणि नावलौकिक

MNS NEWS | मराठमोळी अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवार (Madhuri Pawar) मनसे दहीहंडी उत्सवानिमित्त वणीत येत आहे. ती प्रसिद्ध नृत्यांगना तर आहेच शिवाय उत्कृष्ट नटी सुद्धा आहे. अतिशय खडतर जीवन प्रवासात तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. गरिबी, अपार कष्ट आणि आता मिळालेले नावलौकिक स्वप्नवत असले तरी तिच्या जिद्दीला सॅल्युट करावाच लागेल. Madhuri Pawar Apsara of Maharashtra, rising star of cinema.

माधुरी पवारचा जन्म साताऱ्यातील एका सामान्य कुटुंबात झाला आहे. ‘महाराष्ट्राची लोककला’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून माधुरीने तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ‘अप्सरा आली’ या कार्यक्रमात ती सहभागी झाली होती. ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘देवमाणूस’ अशा अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. ‘देवमाणूस’ मालिकेत तिने साकारलेली चंदा ही भूमिका प्रचंड गाजली आहे. मराठी, हिंदी आणि कन्नड भाषेतील चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

माधुरी पवार साताऱ्यातच राहते, ती साताऱ्यातच जन्मली व मोठी झाली. तिचे वडील लहानसहान कामे करायचे, घरची परिस्थिती हलाखीची होती. तिला शिक्षण घेता यावं म्हणून तिला आजोळी ठेवलं. ती आजीसोबत पत्र्याच्या झोपडीत राहायची. त्या घरात राहून तिने शिक्षण पूर्ण केलं आणि नृत्य व अभिनयाची आवड जोपासली आणि त्यातच करिअर करायचा निश्चय केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने व मनसे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून भव्यदिव्य दहीहंडी साजरी करण्यात येत आहे. प्रसिद्ध गोविंदा पथकांची हजेरी आणि थरारक मानवी मनोरे अनुभवता येणार आहे. लाखो रुपयांच्या बक्षिसाची लयलूट केल्या जाणार आहे. या मनसे दहीहंडीचे प्रमुख आकर्षण मात्र सिने अभिनेत्री माधुरी पवार ह्याच असणार आहेत.
ROKHTHOK NEWS