Home Breaking News खरंच….”मशाल” चिन्ह मतदारापर्यंत पोहचलेच नाही ..!

खरंच….”मशाल” चिन्ह मतदारापर्यंत पोहचलेच नाही ..!

● ग्रामीण मतदार चिन्हाबाबत अनभिज्ञ

577
C1 20240910 18540384

ग्रामीण मतदार चिन्हाबाबत अनभिज्ञ

Political News: सुनील पाटील | विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. महाविकास आघाडीत विधानसभा निहाय जागावाटपावर चर्चा होत आहे. वणी विधानसभेची जागा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाला मिळावी यासाठी अट्टाहास सुरू आहे. मात्र पक्षाचे चिन्ह “मशाल” ग्रामीण व आदिवासी बहुल मतदारपर्यंत पोहोचलेच नाही असे धक्कादायक तथ्य होत असलेल्या विविध सर्वेक्षणातून समोर येत आहे. Indeed….”Mashal” symbol did not reach the voters..!

विविध संघटना, संस्था, राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण करताहेत. त्या माध्यमातून इलेक्टिव्ह मेरिट उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याची रणनीती आखल्या जात आहे. वणी विधानसभेत महायुती कडून भाजपाचाच उमेदवार “फिक्स” आहे तर महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) या दोन पक्षात उमेदवारी मिळावी यासाठी रस्सीखेच दिसून येत आहे.

वणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे “मशाल” हे चिन्ह ग्रामीण व आदिवासी बहुल भागात काही ठिकाणी पोहोचले नाही याबाबत चिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. उमेदवारी मिळावी व महाविकास आघाडीच्या बळावर निवडून येणारच असे दिवास्वप्न अनेकांना पडले आहे. खासदारांसोबत सख्य आहे असे भासवून उमेदवारी मिळवण्याचा आव आणल्या जात आहे. शाखा स्थापन करून संघटनात्मक बांधणी करता येईल मात्र मतदारांना चिन्हांची माहिती कोण देणार.

शिवसेनेला मानणारा मोठावर्ग वणी मतदारसंघात होता, व आज सुध्दा आहे. पूर्वापार शिवसेनेचे 22 ते 27 टक्के
मतदार आहेत. शिवसेना बाळासाहेबांची व चिन्ह “धनुष्यबाण” असल्याचे मतदार गृहीत धरत आहे आणि ते न्यायालयीन दृष्ट्या खरं ही आहे. शिवसेना दुभंगल्याचेही अनेक ग्रामीण व आदिवासी बहुल भागातील मतदारांना माहीत नसल्याने प्रचंड घोळ होत आहे. आता मात्र शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे “मशाल” हे चिन्ह असल्याचे पटवून द्यावे लागणार आहे आणि गुडघ्याला बाशिंग बांधलेला कोणताच उमेदवार तसं करताना दिसत नाही.

शिवसेना (उबाठा ) तील वाद काँग्रेसच्या पथ्यावर
लोकसभा निवडणुकीत दारव्हा-दिग्रस मतदारसंघ काँग्रेसला तर वणी मतदारसंघ शिवसेना (उबाठा ) पक्षाला, असे संगनमताने ठरल्याची चर्चा रंगत आहे. काँग्रेस पक्षाकडे उमेदवारांची “जम्बो” लाईन आहे. शिवसेना (उबाठा) पक्षात “इन मीन तीन” उमेदवारांची दावेदारी असली तरी त्यांच्यातील अंतर्गत वाद प्रकर्षाने दिसून येत असल्याने ही बाब काँग्रेसच्या पथ्यावर पडणार असे जवळपास निश्चित झाले आहे.
ROKHTHOK NEWS

Previous article“रुद्रा”चा अखेर मृतदेहच आढळला
Next articleगळफास लावून विध्यार्थ्यांने संपवले जीवन
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.