Home क्राईम भंडारा जिल्ह्यातुन 24 तासात आरोपीला अटक

भंडारा जिल्ह्यातुन 24 तासात आरोपीला अटक

● शिरपूर पोलिसांची धडक कारवाई

966
C1 20240916 14575702

शिरपूर पोलिसांची धडक कारवाई

Crime News | शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांची सव्वा लाख रुपये किमतीची बैल जोडी चोरीला गेली होती. या प्रकरणी शिरपूर पोलिसात 15 सप्टेंबरला तक्रार दाखल करण्यात आली. ठाणेदार माधव शिंदे यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या 24 तासात भंडारा जिल्ह्यातून आरोपीला ताब्यात घेतले. Thanedar Madhav Shinde turned the wheels of investigation and nabbed the accused from Bhandara district in just 24 hours.

नामदेव दादाजी लांडे हे कृष्णापुर येथील शेतकरी आहेत. नेहमीप्रमाणे त्यांनी शेतकाम आटोपल्यावर आपली बैलजोडी शेतात बांधली व घरी आले. 14 सप्टेंबर च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बैलजोडी चोरून नेली. दुसऱ्या दिवशी ही बाब शेतकऱ्याला कळताच त्यांनी थेट शिरपूर पोलीस ठाणे गाठले व रीतसर तक्रार दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणेदार शिंदे यांनी याबाबत वरिष्ठांना कळवले व तपास आरंभला. गावातील नागरिकांना विचारपूस केली. कोणी अनोळखी व्यक्ती गावात दिसले का अशी विचारणा केली. तांत्रिक तपासाची दिशा ठरवत संशयित भोलाराम सुरेश पडोळे वय 33 वर्षे रा. डोर्ली ता.वणी याला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवला असता अन्य दोघे सुद्धा गुन्ह्यात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी संशयित आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली व पिकअप वाहनाने बैलजोडी भंडारा जिल्ह्यात नेल्याचे सांगितले. रात्रीच पोलिसांनी एक पथक रवाना केले आणि आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या घटनेत पिकअप वाहन व बैलजोडी असा 4 लाख वीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर अटकेतील आरोपी व संशयिताबाबत तपास सुरू आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंन्द्रे, पोलीस निरीक्षक (LCB) ज्ञानोबा देवकते, यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार माधव शिंदे. PSI रावसाहेब बुधवंत, गंगाधर घोडाम, गजानन सावसाकडे, विजय फुल्लुके यांनी पार पाडली आहे.
ROKHTHOK NEWS

Previous articleआणि…राजू उंबरकरांनी उचलला शस्त्रक्रियेचा खर्च..!
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.