Home Breaking News आणि…राजू उंबरकरांनी उचलला शस्त्रक्रियेचा खर्च..!

आणि…राजू उंबरकरांनी उचलला शस्त्रक्रियेचा खर्च..!

● आर्थिक सहकार्य नव्हे, आयुष्यात आशेचा किरण

691
C1 20240915 20034633
आर्थिक सहकार्य नव्हे, आयुष्यात आशेचा किरण

MNS NEWS | रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असं मानणारे एकमेव नेतृत्व मनसे नेते राजू उंबरकर. एका महिलेच्या पोटात गाठ असल्याचे कळले. त्याची शस्त्रक्रिया करणे गरजेचे आणि खर्च मोठा होता. ही बाब कळताच उंबरकरांनी थेट रुग्णाची भेट घेत डॉक्टरांशी चर्चा करून पोटातील गाठ काढण्याचे सुचवले. यासाठी लागणारा खर्च महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल असे स्पष्ट केले. MNS leader Raju Umbarkar is the only leader who believes that service to patients is service to God.

सतत रुग्णसेवेचा ध्यास घेत अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारे व्यक्तिमत्व क्वचितच आढळते मात्र याला अपवाद मनसे नेते राजू उंबरकर हे आहेत. रुग्णांना उपचारासाठी तात्काळ मदत मिळावी यासाठी मनसेने मागील 16 वर्षांपासून रुग्णसेवा केंद्र सुरू केले आहे. त्या माध्यमातून अनेक रुग्णांना मदत मिळाली आहे.

मारेगाव तालुक्यातील गोंड बुरांडा येथे वास्तव्यास असलेल्या पौर्णिमा दामोदर दगडे या महिलेच्या पोटात गाठ असल्याने त्याची शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. उपचाराचा खर्च भरमसाठ होता काय करावे हेच त्या परिवाराला कळेनासे झाले. ही बाब उंबरकरांना समजली त्यांनी. रुग्णाची भेट घेतली, उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा केली आणि त्वरित उपचार करण्याच्या सूचना देत लागणारा खर्च करण्याची तयारी दर्शवली.

अशा कठीण काळात कोणीतरी आपल्या पाठीशी ठामपणे उभं आहे, ही भावना त्या परिवारासाठी खूपच मोठी होती. उंबरकरांनी दाखवलेल्या या कृतीने केवळ त्यांच्या शारीरिक वेदनांवरच उपाय नाही, तर त्यांच्या मनात नव्या स्वप्नांना आणि जगण्याच्या इच्छेला बळ मिळणार आहे. जनहित सर्वतोपरी हेच आपलं धोरण आहे आणि त्या धोरणावर आपण काम करतो आणि यापुढे देखील जनसामान्यांसाठीच काम करत राहणार असे उंबरकरांनी स्पष्ट केले आहे.

यापूर्वी सुद्धा देवदूत ठरले उंबरकर

वणीतील रामपुरा येथील 19 वर्षीय अदित्य चा अपघात झाला होता. गंभीर दुखापत झाल्‍याने डॉक्टरांनी शस्‍ञक्रिया करावी लागेल अशा सुचना दिल्‍यात. कायमस्वरूपी अपंगत्व आणि मेंदू निकामी होण्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केल्‍यामुळे घरची मंडळी हादरुन गेली. परिस्थिती अत्‍यंत हालाखीची आणि उंबरकर देवदूतासारखे अवतरले, सध्‍यस्थितीत अदित्‍य ठणठणीत आहे.

आकाश विजय बागडे (21) हा वणीतील नांदेपेरा रोड, बँक कॉलोनी येथील तरुण त्याची प्रकृती अचानक बिघडली. वणीत उपचार शक्य नसल्याने डॉक्टरांनी त्याला नागपूर येथे रेफर केले. नागपूर येथील डॉक्टरांनी त्याला 3 ते 4 लाखांचा खर्च सांगितला होता. घरची परिस्थिती हलाखीची. सदर बाब राजू उंबरकर यांना कळताच त्यांनी  2 लाखांची मदत व पुढील उपचाराची जबाबदारी उचलली होती.

सूरज मोहन काळे हा मारेगाव (कोरंबी) येथील निवासी त्याचा वणी-मोहोर्ली या मार्गवर अपघात झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. लोकवर्गणीतून उपचाराचा खर्च भागत नव्हता. गंभीर बाब लक्षात येताच उंबरकरांनी उर्वरीत खर्च करण्याची तयारी दर्शवली आणि एक महिन्याच्या उपचारानंतर सुरज सुखरूप आपल्या गावी परतला.
ROKHTHOK NEWS