Home Breaking News शिवसेना (उबाठा) बॅकफूटवर, काँग्रेसचा दावा स्ट्रॉंग

शिवसेना (उबाठा) बॅकफूटवर, काँग्रेसचा दावा स्ट्रॉंग

● जनहीतालाच मतदारांची पसंती ● सर्व्हेतील धक्कादायक निष्कर्ष

1758
C1 20241005 13373142
Img 20241016 Wa0023

 जनहीतालाच मतदारांची पसंती
 सर्व्हेतील धक्कादायक निष्कर्ष

सुनील नाईक पाटील : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी अवघ्या काही दिवसातच सुरू होणार आहे. महायुती व महाविकास आघाडीत सामना रंगणार आहे. वणी विधानसभा काँग्रेस पक्षालाच मिळावी यासाठी काँग्रेसचे नेते ठाम आहेत. जनहीतालाच मतदारांची पसंती असल्याचे सर्व्हेतील निष्कर्षावरून स्पष्ट होत असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे शिवसेना (उबाठा) बॅकफूटवर तर काँग्रेसचा दावा स्ट्रॉंग झाला आहे. The Congress leaders are adamant that the Congress party should get the Wani Vidhan Sabha.

ब्‍लॅक डायमंड, खनिजानं समृध्‍द असणारी भुमी म्‍हणुन विदर्भात नावारुपांस आलेला मतदारसंघ म्‍हणजे वणी. तसं पहायला गेलं तर कॉग्रेसचा पारंपारिक बालेकिल्‍ला. मागील अकरा पंचवार्षीक निवडणुकीचा विचार केल्‍यास सहा वेळा कॉग्रेस पक्षाने निर्विवाद वर्चस्‍व स्‍थापित केल्‍याचे दिसून येते. शिवसेना, सीपीआय व अपक्ष उमेदवारांनी प्रत्‍येकी एकदा आमदारकी भुषवली आहे. तर भाजपाने सलग दोन “टर्म” अधिराज्‍य गाजवले.

महाविकास आघाडीत वणी विधानसभा मतदारसंघ कोणाच्‍या वाटयाला जाणार यावर तर्क वितर्क लढवल्‍या जात आहे. लोकसभा किंवा जिल्‍हा निहाय विचार केल्‍यास एक मतदारसंघ मिळावा अशी आग्रही मागणी शिवसेना (उबाठा) व राष्‍ट्रवादी (एसपी) पक्षाने केली आहे. दारव्‍हा-दिग्रस शिवसेनेचा तर पुसद राष्‍ट्रवादीचा पारंपारीक मतदारसंघ आहे. माञ वणी विधानसभेकरीता शिवसेना (उबाठा) पक्षाने आग्रही भुमिका घेतल्‍याने तिढा निर्माण झाला आहे. वणी विधानसभेत कॉग्रेस पक्षाचा चांगला जनाधार आहे. यामुळे वणी मतदारसंघ पदरात पडावा याकरीता खा. प्रतिभा धानोरकर, प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले व विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार प्रयत्‍नाची पराकाष्‍टा करत आहे.

वणी मतदारसंघ कॉग्रेस पक्षालाच सुटेल अशी शक्‍यता वर्तविण्‍यात येत आहे. संस्‍था, संघटना व राजकीय पक्षाच्‍या सर्व्‍हेक्षणात कॉग्रेस पक्ष वरचढ असल्‍याचे दिसत आहे. माजी आमदार वामनराव कासावार यांना मानणारा वर्ग मतदारसंघात आहे. तसेच पक्षात झंझावात निर्माण करणारे संजय खाडे यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी, युवकांच्या हितासाठी आणि निराधारांना आधार देण्यासाठी “चालतं – फिरतं जनहित केंद्र” हा अभिनव उपक्रम राबवलाय यामुळे ग्रामीण भागात त्‍यांना मिळणारा प्रतिसाद उल्‍लेखनिय आहे. बहुतांश सर्व्‍हेतील निष्‍कर्षावरुन संजय खाडे प्रबळ दावेदार ठरताहेत तर इलेक्‍टीव्‍ह मेरिट उमेदवार म्‍हणुन ते पुढे आले आहे.
Rokhthok News