Home Breaking News अखेर….महत्‍वाकांक्षी प्रकल्‍पाचे भुमिपुजन व लोकार्पण आचारसंहितेमुळे ठप्प

अखेर….महत्‍वाकांक्षी प्रकल्‍पाचे भुमिपुजन व लोकार्पण आचारसंहितेमुळे ठप्प

● 215 कोटी रुपयांची होती विकासकामे ● मतदारसंघात शास्‍वत विकास महत्‍वाचा

853
C1 20241015 19450377
Img 20241016 Wa0023

215 कोटी रुपयांची होती विकासकामे
मतदारसंघात शास्‍वत विकास महत्‍वाचा

Political News | वणी विधानसभेत विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मागील दहा वर्षात शासनाच्‍या माध्‍यमातुन मोठया प्रमाणात निधी खेचून आणला. नुकतेच अमृत पाणी पुरवठा योजना, क्रिडा संकुल, न्‍यायालयाच्‍या इमारतीला मंजुरात मिळाली तांञीक बाबीची पुर्तता झाली. या महत्‍वाकांक्षी प्रकल्‍पाचे भुमिपुजन तर अडेगांव -खातेरा येथील नदीवरील पुल व नाटयसंकुलाचे लोकार्पण होणार होते माञ आचारसंहिता लागल्‍याने भुमिपुजन आणि लोकार्पण ठप्प झाले. मात्र मतदारसंघात शास्‍वत विकास महत्‍वाचा असल्याचे मत आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी व्यक्त केले. Bhumipujan and Lokarpana came to a standstill due to the imposition of code of conduct.

वणी शहराची तहान भागविण्‍यासाठी कार्यान्‍वीत योजना अपुरी पडत होती. भविष्‍यात वणीकर नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागु नये याकरीता ‘अमृत’  पाणीपुरवठा ही 140 कोटी रुपयांच्‍या महत्‍वाकांक्षी योजनेचा पाठपुरावा आ. बोदकुरवार यांनी केला. सर्व प्रक्रीया व तांञीक बाबीची पुर्तता करुन योजना खेचून आणली.

अमृत टप्पा- 02 या योजनेमुळे वणी शहरातील जवळपास सव्वा लाख वणीकरांना योजनेचा फायदा होणार असून या योजनेमुळे सर्वाना पिण्याकरीता शुध्द पाणी, वापरण्याकरीता सुध्दा मुबलक पाणी मिळणार आहे. 140.10 कोटींच्या या पाणीपुरवठा योजने मध्ये वणीपर्यंत 21 किलोमीटर लांबीची 500 व 600 व्यासाची जलवाहिनी, नवीन इनटेक वेल, जॅकवेल, आरसीसी संप, इस्पेक्शन वेल, पंपिंग हाउस,  बीपीटी, अॅप्रोच ब्रिज, रांगणा भुरकी पंपाकडे जाणारा अॅप्रोच रोड, पंपिग मशिनरी, डब्ल्यूटीपी, ट्रान्समिशन नेटवर्क, वर्धा नदीवर व्हीटी बंधारा, वितरण व्यवस्था जलवाहिन्यांची दुरुस्ती आदींचा समावेश आहे.

मैदानी खेळात वणींचे युवक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावे, त्‍यांना क्रीडानुकूल वातावरण मिळावे हे स्‍वप्‍न उराशी बाळगुन आ. बोदकुरवार यांनी प्रधानमंत्री जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी अंतर्गत 20 कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. तसेच 65 कोटी रुपये अंदाजीत खर्च असलेल्‍या न्‍यायालयाची इमारत या तिन्‍ही महत्‍वाकांक्षी योजनांचे भुमिपुजन आचारसंहितेच्‍या पुर्वी व्‍हावे असा प्रयत्‍न आ. बोदकुरवार यांचा होता.

वणी विधानसभा क्षेञात अडेगांव -खातेरा येथील नदीवर 25 कोटी रुपयांचा पुल बांधण्‍यात आला. तर येथील राम शेवाळकर नाटय संकुल या दोन्ही वास्तूचे लोकार्पण करण्‍यात येणार होते. तीन प्रकल्‍पाचे भुमिपुजन व दोन वास्‍तुचे लोकार्पण आचारसंहिता लागल्‍यामुळे करता आले नाही. परंतु निवडणुकीनंतर महा‍युतीचेच सरकार येणार असल्‍याचा विश्‍वास व्‍यक्‍त करत भावी मुख्‍यमंञी देवेंद्र फडणवीस यांचे हस्‍तेच भुमिपुजन करण्‍यात येईल अशी ग्‍वाही आमदार संजीवरेडडी बोदकुरवार यांनी दिली.
Rokhthok News