Home Breaking News प्रदूषणाचा भस्मासुर, सहनशीलतेचा अंत पाहू नका

प्रदूषणाचा भस्मासुर, सहनशीलतेचा अंत पाहू नका

● शेतकऱ्यांच्या जखमेवर मारली का फुंकर !

1
C1 20241018 13492590
Img 20240930 Wa0028

शेतकऱ्यांच्या जखमेवर मारली का फुंकर !

Political News | वणी उप विभागात प्रदूषणाचा भस्मासुर बोकाळलाय, विविध समस्या आ वासून उभ्या ठाकल्या आहेत. याची सोडवणूक करणार कोण ? असा संतप्त सवाल उपस्थित करत सहनशीलतेचा अंत पाहू नका असा निर्वाणीचा इशारा मनसे नेते राजू उंबरकर यांनी दिला आहे. MNS leader Raju Umbarkar has warned Nirvani not to see the end of tolerance.

लोकप्रतिनिधी आणि प्रशासन सातत्याने स्थानिकांना वाऱ्यावर सोडत असल्याचे चित्र नवे नाही. निवडणुका येतात जातात, मतदारांना खोटे आश्वासन देऊन यांच्या पायघड्या घालण्याचे दिवस सुरू झालेत. वर्षानुवर्षे स्थानिकांना गृहीत धारणाऱ्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ असल्याचे उंबरकरांनी स्पष्ट केले आहे.

वेकोली निर्मीत धुलीकण प्रदुषणाने शेकडो हेक्‍टरवरील शेतपिके दरवर्षी उध्वस्त होतात. शेतकऱ्यांना कवडीची मदत दिल्या जात नाही. आंदोलनाची दखल घेतल्या जात नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळ, वेकोली प्रशासन व लोकप्रतिनिधी जणू शेतकऱ्यांची थट्टा करतात की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. पीडित शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच वर्षात फुंकर घालण्याची तसदी न घेणारी ही व्यवस्था आता आदर्श आचारसंहितेचे दाखले देत पुन्हा आश्वासने देण्यासाठी मोकळे झाले आहेत.

वेकोलीच्‍या माध्‍यमातुन उत्‍खनन झालेल्‍या कोळशाचे दळणवळण संपुर्ण भारतभर करण्‍यात येते. अनेक अवजड वाहनांतुन होत असलेली वाहतुक आणि यामुळे निर्माण होणारे धुलीकण प्रदुषणाने रस्‍त्‍याच्‍या दुतर्फा असणाऱ्या येणक, येनाडी, कोलगाव, शेवाळा, साखरा,  शिवणी या परिसरातील 306 हेक्टर शेत जमीन बाधित झाली आहे. तर उपविभागात प्रदूषणाने तांडव माजवल्यामुळे शेतातील शेतपिके पुर्णतः ध्‍वस्‍त झाली आहे.

उपविभातील शेकडो हेक्‍टरवरील शेतीची उत्‍पादन क्षमता नष्‍ट झाली आहे. यामुळे स्‍थानिक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो यामुळे बहुतांश शेतकरी आत्‍महत्‍येच्‍या उंबरठयांवर आहेत. आता सहनशीलतेचा अंत बघू नका निवडणुकीनंतर गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेने सोबत आहे. असा निर्वाणीचा इशारा मनसे नेते राजू उंबरकर यांनी दिला आहे.
Rokhthok News

Previous articleकुऱ्हाडीने मारहाण, दोघे गंभीर जखमी
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.