● कार्यकर्त्यांत जल्लोष, उत्साह आणि चैतन्य
Political News | वणी विधानसभेतील आपल्या हक्काचा कामाचा माणूस निवडणूक रिंगणात उतरणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांत जल्लोष, उत्साह आणि चैतन्य निर्माण झाले आहे. शुक्रवारी दिनांक 25 ऑक्टोबरला महाराष्ट्र सैनिक मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत. “लढणार आणि जिंकणारच” असा निर्धार मनसे नेते राजू उंबरकर यांनी केला आहे. MNS leader Raju Umbarkar has decided to “fight and win”.
वणी विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात घमासान होणार असल्याचे प्रकर्षाने जाणवते आहे. प्रत्येक राजकीय पक्ष तुल्यबळ उमेदवाराला रिंगणात उतरवण्याची तयारी करताहेत. विरोधात कोण असेल याचा विचार न करता पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी मनसे नेते राजू उंबरकर यांची महाराष्ट्रात सर्वप्रथम उमेदवारी जाहीर केली. उंबरकर यांचेवर असलेला विश्वास आणि त्यांचे कार्य बघता “कामाचा माणूस” हाच असल्याचे त्यांनी हेरले आणि उमेदवारी जाहीर करण्यात आली.
एकनिष्ठ, पक्षनिष्ठ व सदोदित सर्वसामान्य, सर्वसमावेशक नागरिकांच्या मदतीला धावून जाणारा तरुण, तडफदार युवा नेता म्हणून उंबरकरांना विधानसभा मतदारसंघात ओळखल्या जाते. निवडणुका येतात-जातात मात्र ऐन निवडणुकीच्या कालखंडात नागरिकांचा कळवळा दाखवत मतदारांना आकृष्ट करणाऱ्यांना धडा शिकवण्याची ताकद मतदारांच्या मनगटात असून कामाचा माणूस कोण? हे ओळखण्याची सत्त्वपरीक्षा मतदारांची असल्याचे मत उंबरकरांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार मनसे नेते राजू उंबरकर शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. मतदार संघातील हजारो समर्थकांनी येथील शासकीय मैदानावर सकाळी 9 वाजता उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. ढोल ताशांच्या गजरात वाजत-गाजत, जल्लोषात उत्साहात “लढणार आणि जिंकणारच” असा निर्धार करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
ROKHTHOK NEWS