Home Breaking News अखेर…संजय देरकर शिवसेना(उबाठा)चे अधिकृत उमेदवार

अखेर…संजय देरकर शिवसेना(उबाठा)चे अधिकृत उमेदवार

● महाविकास आघाडीतील तिढा सुटला

1
C1 20241023 19162802
Img 20240930 Wa0028

महाविकास आघाडीतील तिढा सुटला

सुनील पाटील | अनेक तर्क वितर्क लढविण्यात येत असलेल्या वणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उबाठा) पक्षाने अखेर बाजी मारली आहे. संजय देरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. Sanjay Derkar’s candidature has been announced.

वणी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून काँग्रेस की शिवसेना (उबाठा) या घटक पक्षातील कोणाला उमेदवारी मिळणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले होते. काँग्रेस पक्षाच्या अनेकांनी उमेदवारी मिळावी याकरिता फिल्डिंग लावली होती. तर शिवसेना (उबाठा) पक्षाकडून विश्वास नांदेकर, संजय निखाडे व संजय देरकर यांचा प्रबळ दावा होता. पक्षश्रेष्ठींनी विजयाची क्षमता लक्षात घेता संजय देरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

संजय देरकर यांच्या उमेदवारीमुळे वणी विधानसभा निवडणुकीत तुल्यबळ लढत होणार आहे. देरकर यांना मानणारा मोठा वर्ग मतदारसंघात आहे. त्यातच जातीय समीकरण त्यांच्या पथ्यावर पडणार का हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकूणच मनसेचे राजू उंबरकर, भाजपचे विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व शिवसेना (उबाठा) पक्षाचे संजय देरकर यांच्यातील लढत रंगतदार होणार हे निश्चित.
Rokhthok News

Previous articleकामाचा माणूस… शुक्रवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.