Home Breaking News आरंभ…..बोदकुरवारांचे नामांकन दाखल, लाडक्‍या बहिनींची प्रचंड गर्दी

आरंभ…..बोदकुरवारांचे नामांकन दाखल, लाडक्‍या बहिनींची प्रचंड गर्दी

● ढोल ताशांचा गजर, उत्‍साह आणि जल्‍लोष

911
C1 20241028 17315849
C1 20241123 15111901

ढोल ताशांचा गजर, उत्‍साह आणि जल्‍लोष

Political News | वणी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे कणखर नेतृत्‍व म्‍हणुन उदयास आलेले विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सोमवार दिनांक 28 ऑक्‍टोबरला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी प्रचंड शक्‍तीप्रदर्शन करत शहरातुन भव्‍य मिरवणुक काढण्‍यात आली. लाडक्‍या बहिनींनी यावेळी कमालीची गर्दी केली होती तर ढोल ताशांच्‍या गजरात कार्यकर्ते थिरकत होते. निवडणुक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामांकन दाखल करतांना मध्य प्रदेशचे मंत्री प्रल्हाद पटेल प्रामुख्‍याने उपस्थित होते. Sanjeevreddy Bodkurwar filed his nomination form on Monday, October 28.

Img 20241028 172040

सलग दोनवेळा वणी विधानसभेतुन निवडुन आलेल्‍या संजीवरेड्डी बोदकुरवार यांना पक्षाने तिसऱ्यांदा संधी दिली आहे. आता ते प्रतिस्‍पर्धी उमेदवारांवर मात करत हॅट्रीक साधणार का हे बघणे औत्‍सुक्‍याचे ठरणार आहे. मतदारसंघात भाजपाने मजबुत फळी निर्माण केली आहे. बुथ लेवल पर्यंत कार्यकर्ते राबताहेत. त्‍यातच राज्‍य सरकारने राबवलेल्‍या योजनांचा फायदा यावेळी भाजपला होईल असे बोलल्‍या जात आहे.

आयोजित रॅलीत सहभागी होण्यासाठी वणी, मारेगाव,  झरीजामणी तालुक्यातील महिला-पुरुष कार, जीप,  क्रुझर, ऑटोरिक्षा, दुचाकी आदी वाहनांतून शहरात दाखल झालेत. दुपारी एक वाजता स्थानिक शासकीय मैदानापासून सुरू झालेल्या मिरवणुकीत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, त्यांच्या सौभाग्‍यवती ललिता बोदकुरवार, माजी नगराध्‍यक्ष तारेंद्र बोर्डे, दिनकर पावडे, रवी बेलूरकर, संजय पिंपळशेंडे हे प्रमुख पदाधिकारी खुल्‍या वाहनातुन अभिवादन करत निवडणुक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयापर्यंत पोहचले.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी स्थानिक शासकीय मैदानावर मोठ्या जाहीर सभेला संबोधित केले.  यावेळी व्यासपीठावर मंत्री प्रल्हाद पटेल, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, शिवसेना शिंदे गटाचे सुधाकर गोरे, राष्ट्रवादीचे आशिष मोहितकर आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
ROKHTHOK NEWS