Home Breaking News Wani Assembly…चौरंगी लढतीचा माहोल

Wani Assembly…चौरंगी लढतीचा माहोल

● प्रचंड अटीतटीच्या लढतीचे संकेत ● मविआ ची भूमिका तळ्यातमळ्यात

1050
C1 20241028 07211542

प्रचंड अटीतटीच्या लढतीचे संकेत
मविआ ची भूमिका तळ्यातमळ्यात

सुनील नाईक पाटील | वणी विधानसभेची निवडणूक कमालीची रंगतदार होणार आहे. विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार सोमवारी तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वणी विधानसभेत चौरंगी लढतीचा माहोल व प्रचंड अटीतटीच्या लढतीचे संकेत मिळत असले तरी पक्षश्रेष्ठींनी “विश्वास” दाखवत बोदकुरवार यांना निवडणूक रणसंग्रामात उतरवले आहे. MLA Sanjeevreddy Bodkurvar will file his candidature for the third time on Monday.

लोकसभा निवडणुकीत जातीय समीकरण प्रभावी ठरले होते. तेव्हा एकास-एक लढत झाली आणि चित्र पालटले. आता मात्र ती परस्थिती राहिलेली नाही, लोकसभा व विधानसभेचे गणित आणि मुद्दे वेगवेगळे असतात त्याचा प्रभाव या निवडणुकीत जाणवणार आहे. लोकसभा निवडणुकीत मनसे महायुती सोबत होती तर शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडी सोबत असल्यामुळे कोण किती पाण्यात आहे हे ठरवता येणार नाही.

वणी मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर विधानसभेच्या रिंगणात शड्डू ठोकून विरोधकांना आव्हान देत आहे. त्या प्रमाणेच वणी विधानसभेची जागा शिवसेना ठाकरे गटाच्या कोट्यात गेल्याने काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांचे स्वप्नभंग झाले आहे आणि उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वणी विधानसभा मतदारसंघात 2014 मध्ये भाजपची त्सुनामी आली. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी अनपेक्षितपणे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचे विश्वास नांदेकर यांचेवर मात देत 5,606 मताने विजय मिळवला होता. तर काँग्रेस चे वामनराव कासावर 6,214 मतांनी तिसऱ्या स्थानी होते. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत बोदकुरवार यांचा ग्राफ वाढला होता तर त्यावेळी शिवसेनेसोबत युती होती. आणि प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसचे वामनराव कासावार यांना मातदेत तब्बल 27,795 मताधिक्याने विजय मिळवला होता.

मागील विधानसभेच्या तुलनेत सर्वच राजकीय पक्षांचा आलेख बदलला आहे. मनसेने संपूर्ण मतदारसंघात पक्षाचा विस्तार केला आहे, सदोदित नागरिकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी तत्पर असल्याने मतदारात उंबरकर यांच्याबाबत सहानुभूती आहे. शिवसेना ठाकरे गटाचा प्रभाव सध्यस्थीतीत किती आहे हे अंतर्गत कलहामुळे अद्याप स्पष्ट झाले नाही, उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा एकमेकांवर “विश्वास” नाही तर घटक पक्ष काँग्रेसची भूमिका तळ्यातमळ्यात आहे. यामुळे होऊ घातलेली निवडणूक याक्षणी कोणत्या वळणावर आहे याचे चित्र अस्पष्ट आहे.

अवघे दोन दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बाकी आहेत. सोमवारी भाजपचे विद्यमान आमदार बोदकुरवार तिसऱ्यांदा निवडणूक रणसंग्रामात उडी घेणार आहेत. मनसेच्या उंबरकरांनी नामांकन दाखल केले आहे. तसेच मविआ चे संजय देरकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. वणी विधानसभेतील निवडणुकीचे खरे चित्र उमेदवारी अर्ज मागे घेतल्यावर स्पष्ट होईल मात्र चौरंगी लढतीचा तुल्यबळ “भिडू” कोण ? हे लवकरच कळणार आहे.
ROKHTHOK NEWS