Home Breaking News मनसेचा दणका… शेतकऱ्यांच्या कापसाला मिळवून दिला भाव

मनसेचा दणका… शेतकऱ्यांच्या कापसाला मिळवून दिला भाव

● दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांची होतेय लूट

3698
C1 20241029 15532690

दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांची होतेय लूट

Wani News | निळापुर ब्राम्हणी मार्गावरील गुलाबप्रेम जिनिंग मध्ये कापूस विक्रेते शेतकऱ्यांची बोळवण करत असल्याची माहिती मनसे नेते राजू उंबरकर यांना मिळाली. थेट तालुकाप्रमुख फाल्गुन गोहोकार हे महाराष्ट्र सैनिकांना सोबत जिनिंग मध्ये पोहचले आक्रमक पवित्रा अवलंबत शेतकऱ्यांना चांगला दर मिळवून दिला. MNS leader Raju Umbarkar got the information that the farmers were being harassed.

दिवाळीचा सण साजरा व्हावा याकरिता तालुक्यातील शेतकऱ्यांनी कापसाच्या गाड्या जिनिंग मध्ये नेल्या. कापूस खरेदीचा पहिलाच दिवस सात हजार रुपये क्विंटल दर मिळेल ही भाबडी आशा बाळगत 25 ते 30 वाहने गुलाबप्रेम जिनिंग मध्ये पोहचले. जिनिंगधारकाने अल्प दर देण्याचे ठरवताच शेतकरी बिथरले, रास्तारोको केला व उंबरकर यांच्यासोबत संपर्क साधला.

महाराष्ट्र सैनिकांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या, 6,600 रुपये दर देणार असल्याचे कळले. गोहोकार यांनी जिनिंगधारकासोबत चर्चा केली, शिवाय आक्रमक भूमिका घेत सात हजार रुपये द्यावे अशी मागणी केली. अखेर शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल 6,900 रुपये देण्याचे ठरले. यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. दिवाळी गोड होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करत उंबरकर यांचे आभार मानले.
Rokhthok News