Home Breaking News Big News …ते वृत्त खोडसाळ, असं घडलंच नाही..!

Big News …ते वृत्त खोडसाळ, असं घडलंच नाही..!

● भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी केलं खंडन

4886
C1 20241106 01494794
भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी केलं खंडन

Political News | मंगळवारी कुणबी समाजाबाबत आक्षेपार्ह वृत्त प्रसारित करण्यात आले होते. ते वृत्त खोडसाळ असल्याचे मत भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी व्यक्त करत असं घडलंच नसल्याचे स्पष्ट केले. तर समाजबांधवात वितुष्ठ निर्माण करण्याचे राजकीय षडयंत्र असल्याचे आ. बोदकुरवार यांनी पत्र परिषदेत स्पष्ट केले. BJP District President Tarendra Borde clarified that the news is hoax.

भाजप प्रचार कार्यालयात मंगळवारी सायंकाळी पत्र परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, माजी सभापती संजय पिंपळशेंडे, दिनकर पावडे, रवी बेलूरकर, गजानन विधाते, संतोष डंभारे व कुणबी समाजाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

सोमवारी सायंकाळी दोन कार्यकर्त्यांत वैयक्तिक विषयावरून वाद झाला होता त्यावेळी जिल्हाध्यक्ष बोर्डे यांनी मध्यस्थी करून सोडवला. मात्र दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी समाज माध्यमातून कुणबी समाजाबाबत भाजप कार्यालयात दोन कार्यकर्त्यांत वाद झाला आणि कुणबी समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची बातमी समाजमाध्यमावर झळकली. समाजबांधवांच्या भावना दुखावल्या आणि वातावरण तप्त झाले.

भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी या वृत्ताचे खंडन केले असून असा जातीय द्वेष पसरविण्याचे कारण नाही असे स्पष्ट केले आहे. भाजपात अनेक कुणबी पदाधिकारी तथा लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या एकजुटीनेच भाजपच्या लोकप्रियतेत वाढ झाली असे सर्वश्रुत असल्याचे आ. बोदकुरवार यांनी विशेषत्वाने नमूद केले आहे.

त्या..कथित वक्तव्याचे उमटले पडसाद
समाज माध्यमावर प्रसारित झालेल्या बातमीने प्रचंड खळबळ माजली. कुणबी समाजातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते वणी पोलीस ठाण्यात पोहचले. आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यावर गुन्हे दाखल करावे व तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली.
ROKHTHOK NEWS