Home Breaking News हिंदुहृदयसम्राटच्‍या ठिकाणी “जनाब”,  काय हा व्‍याभीचार

हिंदुहृदयसम्राटच्‍या ठिकाणी “जनाब”,  काय हा व्‍याभीचार

● राज ठाकरे यांची तुफान फटकेबाजी ● नवा चेहरा राजु उंबरकरच हवा ● ठाकरे व शिंदे यांचेवर शरसंधान

699
C1 20241106 13241515

राज ठाकरे यांची तुफान फटकेबाजी
नवा चेहरा राजु उंबरकरच हवा
ठाकरे व शिंदे यांचेवर शरसंधान

Sunil Naik Patil : महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजु उंबरकर यांच्‍या प्रचारार्थ पक्षप्रमुख राज ठाकरे यांची जाहिर सभा मंगळवारी वणीत संपन्‍न झाली. हजारो जनसमुदायाला संबोधतांना ठाकरे यांनी “ठाकरे शैलीतुन” तुफान फटकेबाजी केली. शिवसेना पक्ष कॉग्रेस, राष्‍ट्रवादी सोबत गेल्‍यानंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्‍या नांवासमोरील ‘हिंदुहृदयसम्राट’ निघुन जातं आणि मुंबईत काही बॅनरवर तर ‘जनाब’ बाळासाहेब ठाकरे असं टाकण्‍यात येतं, काय हा व्‍याभीचार असं परखड वक्‍तव्‍य राज ठाकरे यांनी केले. तसेच उध्‍दव ठाकरे व एकनाथ शिंदे यांचेवर शरसंधान सोडले. यावेळी “नवा चेहरा राजु उंबरकरच हवा” असल्‍याचे स्‍पष्‍ट करत विधानसभेत पाठविण्‍याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले. Party chief Raj Thackeray’s public meeting to campaign for Raju Umbarkar

महाराष्‍ट्र जातीपाती मध्‍ये पिचुन निघालाय, विदर्भ मराठवाडयात शेतकरी आत्‍महत्‍या होताहेत, बेरोजगार रोजगार मिळेल म्‍हणुन ‘आ’ वासुन बसलायं, छोटया छोटयां मुलींवरती बलात्‍कार होताहेत, अनेक महिला पळवल्‍या जाताहेत, अनेक प्रश्‍न महाराष्‍ट्रात निर्माण झालेले असतांना यांचा जो राजकीय खेळ सुरु आहे. ते आता पुन्‍हा येतील तोंडावर पैसे फेकुन मारतील, त्‍यांना माहिती आहे हे आम्‍हालाच मतदान करतील. बाबांनो हा त्‍यांचा समज गैरसमज तुम्‍ही खोडुन टाकत नाही, त्‍यांना त्‍यांची जागा दाखवत नाही तोपर्यंत काही खरं नाही. आतातरी जागे व्‍हा व चांगला उमेदवार निवडा असे भावनात्‍मक संबोधन राज ठाकरे यांनी केले.

राजु उंबरकर यांच्‍या प्रचार सभेत बोलतांना राज ठाकरे यांनी मिष्‍कील टिपन्‍नी सुध्‍दा केली. आमदार खासदारांचे मतदारसंघ इकडे आणि बंगले माञ पुना मुंबईत.  मतदारांनी विचारलं साहेब कुठे आहे तर ते मुंबईला असे सांगण्‍यात येते. तुमच्‍या पेक्षा त्‍यांना बायका पोरं महत्‍वाची आहे असे म्‍हणत “राजु” ची मी गॅरंटी घेतो त्‍यांचा बंगला मुंबई पुण्यात राहणार नाही तो येथेच राहील आणि तुमच्‍या साठी सदैव तत्‍पर असेल.

राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे याचेवर फटकारे ओढले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद ताब्यात घेतले. एवढंच नव्हे तर त्यांनी हनुमान चालीसा पठण करणाऱ्या 17 हजार महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे नोंदवले. बाडगा मुसलमान जास्त नमाज पढतो असा घणाघात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. तर एकनाथ शिंदेला अजीत पवारांच्‍या मांडीला मांडी लावुन बसने आवडत नव्‍हते म्‍हणुन 40 आमदारांना सोबत घेत भाजपासोबत सलगी केली. आता तेच अजीत पवार त्‍यांच्‍या मांडीवर येवून बसल्‍याचे स्‍पष्‍ट केले.

वणी विधानसभा मतदार संघातील उमेदवार राजू उंबरकरसह यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील मनसेचे उमेदवार गजानन वेरागडे, सागर दुधाने, ब्रिजराम किंजर, प्रवीण सुर, गणेश बरबडे, अश्विन जयस्वाल,  संतोष चौधरी, संदीप कोरु, घनश्याम निखाडे, आदित्य दुरुगकर, सचिन भोयर, सुरेश चौधरी मंचावर उपस्थित होते. राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
Rokhthok News