Home Breaking News Big News…संभाजी ब्रिगेडच्‍या अजय धोबे यांची पक्षातून हकालपट्टी

Big News…संभाजी ब्रिगेडच्‍या अजय धोबे यांची पक्षातून हकालपट्टी

● मविआच्या उमेदवाराला मोठा धक्का ● पक्षविरोधी कृत्‍यांमुळे वरिष्‍ठांची कारवाई

1479
C1 20241108 12430359

मविआच्या उमेदवाराला मोठा धक्का
पक्षविरोधी कृत्‍यांमुळे वरिष्‍ठांची कारवाई

Political News | संभाजी ब्रिगेडचे जिल्‍हाध्‍यक्ष अजय धोबे यांनी वणी विधानसभेकरीता अधिकृत उमेदवार म्‍हणुन उमेदवारी दाखल केली होती. पक्षश्रेष्‍ठींना विश्‍वासात न घेता धोबे यांनी निवडणुकीतुन माघार घेत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय निळकंठ देरकर यांना पाठिंबा दिला. पक्षश्रेष्‍ठींना ही बाब कळताच त्‍यांनी तडकाफडकी निर्णय घेत धोबे यांचे निलंबन केले तर संभाजी ब्रिगेडने मविआला दिलेला पाठिंबा काढुन घेतला आहे. Expulsion of Ajay Dhobe of Sambhaji Brigade

संभाजी ब्रिग्रेडची शिवसेना (उबाठा) सोबत युती होती, माञ निवडणुकीपुर्वी युती संपुष्‍ठात आली. यानंतर पक्षाने स्‍वबळावर निवडणुका लढायचा निर्णय घेतला. राज्‍यात 26 ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरवले होते. छानणीच्‍या वेळेस सात उमेदवारांचे अर्ज बाद झाले आता 19 उमेदवार रिंगणात आहे. वणी विधानसभेकरीता जिल्‍हाध्‍यक्ष अजय धोबे यांना अधिकृत उमेदवारी जाहिर करण्‍यात आली होती माञ त्‍यांनी वरिष्‍ठांशी कोणतीही सल्‍ला मसलत न करता मविआच्‍या उमेदवाराला पाठिंबा दिला.

शिवसेना (उबाठा) सोबतची युती तुटल्‍यामुळे पुन्‍हा त्‍यांच्‍याच उमेदवाराला पाठिंबा देणे हे कृत्‍य पक्ष विरोधी आहे. पक्षाने अधिकृत उमेदवार म्‍हणुन अजय धोबे यांना एबी फॉर्म दिला होता. परंतु कोणत्‍याही प्रकारचा संबाद न साधता अर्ज मागे घेतला व महाविकास आघाडीतील घटकपक्षांना पाठींवा जाहीर केला तसेच प्रचार-प्रसार करत असतांना आढळुन आल्‍याने त्‍यांना पक्षातुन तडकाफडकी निलंबीत करण्‍यात आले. असे पञ संभाजी ब्रिगेड चे विभागीय अध्‍यक्ष गजानन रा. भोयर यांनी काढले आहे.

महायुती व मविआ सोबत कदापीही नाही
महायुतीची सनातनी प्रवृत्‍ती व मविआ चे वेगळे पुरोगामी धोरण या विरोधात संभाजी ब्रिगेड मोठा लढा उभारणार आहोत. आमच्‍या पक्षाची भुमिका स्‍पष्‍ठ असुन राज्‍यात 26 उमेदवार निवडणुक रिंगणात स्‍वबळावर उतरवले होते त्‍यातील काहिंचे अर्ज बाद झाले. आता 19 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. तर वणी विधानसभेचे अधिकृत उमेदवार अजय धोबे यांनी पक्षविरोधी कृत्‍य केल्‍याने त्‍यांची पक्षातुन तडकाफडकी हकालपटटी करण्‍यात आली आहे.
मनोज आखरे
प्रदेशाध्‍यक्ष, संभाजी ब्रिगेड
ROKHTHOK NEWS