● मविआला बसणार जबरदस्त फटका.!
Political News | विधानसभेच्या निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली असुन विविध घडामोडींनी आठवडा गाजला आहे. शिवसेना उबाठा पक्षाचे माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर व कॉगेस पक्षाचे जेष्ठ नेते नरेंद्र पाटील ठाकरे यांनी स्वाभीमानी बाणा दाखवत निर्णायक भुमिका घेत मृतावस्थेतील कॉग्रेसला जीवंत करणारे अपक्ष उमेदवार संजय खाडे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आणि निवडणुकीचे पुर्णतः चिञच पालटले. The decisive role of Nandekar and Thackeray completely changed the picture of the election
मागील अनेक वर्षापासुन कॉग्रेस पक्ष मृतप्राय झाला होता, कार्यकर्त्यांना समजणारा व कार्यकर्त्यांच्या हितासाठी झगडणारा नेता अस्तीत्वात नसल्याचे दिसत होते. वंश परंपरा आणि मक्तेदारी मोडीत काढत तरुण तडफदार नेतृत्व संजय खाडे यांचे रुपात उदयास आले. त्यांनी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांत नवी चेतणा व उर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
लोकसभा निवडणुकीत जीवाचे रान करत संजय खाडे यांनी संपुर्ण मतदारसंघ पिंजुन काढला. कार्यकर्ते जागृत झाले आणि त्याचा परिणाम लोकसभेत दिसला. वणी विधानसभेत कॉग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना तब्बल 1 लाख 25 हजाराच्या जवळपास मताधिक्य मिळालं. वणी विधानसभा मतदारसंघात एकेकाळी काँग्रेसचे प्राबल्य होते ते काही वर्षांपासून संपुष्टात आले की काय असे वाटत असतानाच संजय खाडेच्या रुपात तडफदार कार्यकर्ता अवतरला.
महाविकास आघाडीत वणी विधानसभेची जागा कॉग्रेस पक्षाला सुटेल असे चिञ होते. माञ ऐनवेळी आघाडीतील घटक पक्ष शिवसेनेला ही जागा सुटली. अनेक वर्षापासुन शिवसेना रुजवणारे, वाढवणारे माजी आमदार विश्वास नांदेकर यांना उमेदवारी न देता पक्षश्रेष्ठींनी नवख्या उमेदवारांला उमेदवारी दिली. नांदेकरांना ही बाब खटकली आणि त्यांनी पक्ष विरोधी निर्णय घेत अपक्ष उमेदवाराला साथ द्यायचा निर्णय घेतला. असाच काहीसा प्रकार कॉग्रेस पक्षात सुध्दा घडला आणि जेष्ठ नेते नरेंद्र पाटील ठाकरे यांनी बंडाचा पविञा घेत संजय खाडे यांना पाठिंबा दर्शवला.
वणी विधानसभेची निवडणुक अटीतटीची होणार असल्याचे चिञ संपुष्ठात आले असुन अपक्ष उमेदवारांने चांगलीच वातावरण निर्मिती केली आहे. मागील एक वर्षापासुन निवडणुकीची तयारी करण्यात आल्याने त्यांना विविध संघटना, समाज बांधव व काही राजकीय पक्षाने आपसुकच पाठिंबा दर्शवला आहे.
त्यातच शिवसेना उबाठा पक्षाचे नेते विश्वास नांदेकर व कॉगेस पक्षाचे नरेंद्र पाटील ठाकरे हे दोन मजबुत स्तंभ मिळाल्याने संजय खाडे यांची बाजु स्ट्रॉग झाली आहे. विधानसभेची निवडणुक आता चौरंगी होणार की तिरंगी हे कालांतराने स्पष्ट होणार आहे. मात्र नांदेकर व ठाकरे यांची भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे.
Rokhthok News