● संजय खाडे यांच्या प्रचाराचा झंझावात
● मांगरुळ येथील सरपंचाचा खाडे यांना पाठिंबा
Political News : दिनांक 10 नोव्हेंबरला मारेगाव तालुक्यात संजय खाडे यांच्या प्रचाराची तोफ धडाडली. जिकडेतिकडे “शिट्टी”चा आवाज गरजला. नरेंद्र ठाकरे व गौरीशंकर खुराणा, संजय आवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संजय खाडे यांनी मारेगाव तालुक्यातील विविध गावांचा दौरा केला. Sanjay Khade visited various villages of Maregaon Taluka.
यावेळी कोलगाव व मांररुळ येथे भव्य रॅली व प्रचार सभा घेण्यात आली. या रॅलीत हजारो नागरिकांचा सहभाग विलक्षण होता. प्रचार सभेत संजय खाडे यांनी विकासाची “ब्यू प्रिंट” तयार असून फक्त एक संधी द्यावी असे आवाहन मतदारांना केला. यावेळी शिट्टी वाजवून गावक-यांनी संजय खाडे यांना पाठिंबा दर्शवला.
रविवारी प्रचाराचा ताफा मारेगाव तालुक्यात पोहोचला. मांगरूळ या गावातून प्रचाराला सुरुवात झाली. मांगरुळ येथील रहिवाशांनी वाजत गाजत संजय खाडे यांचे स्वागत केले. तर कोलगाव येथील मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात झाली. कोलगाव येथील रहिवाशी मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले. नागरिकांनी संजय खाडे यांना मतदान करू असे आश्वासन दिले.
● सरपंचाचा खाडे यांना पाठिंबा ●
मंगरूळ गावाचे सरपंच प्रमोद केशव आत्राम यांनी अपक्ष उमेदवार संजय खाडे यांना पाठिंबा जाहीर केला. संजय खाडे हे नेहमी सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जातात. त्यांनी सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न सोडवले. जनहित केंद्राच्या माध्यमातून त्यांनी अनेकांचे रखडलेले कामे पूर्ण केलीत. त्यांच्या या कार्यामुळे पाठिंबा जाहीर करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी मांगरुळ येथील प्रचारामध्ये सहभाग घेतला.
●प्रचार सभेत बोलताना नरेंद्र ठाकरे म्हणाले की, ● शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतक-यांचा उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. शेतक-यांनी यावेळी संजय खाडे यांच्या पाठिशी उभे राहावे. संजय खाडे हे शेतकरी आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक शेतक-यांचे प्रश्न सुटले. त्यांना शेतक-यांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे त्यांच्यासारख्या शेतक-याला विधानसभेत पाठवणे गरजेचे आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
ROKHTHOK NEWS