Home Breaking News लाडक्या बहिणींनी केले बोदकुरवारांचे “औक्षण”

लाडक्या बहिणींनी केले बोदकुरवारांचे “औक्षण”

● सजवलेल्या बैलबंडीतून प्राचाराचा माहोल

482
C1 20241112 13204133

सजवलेल्या बैलबंडीतून प्राचाराचा माहोल

Political News | विधानसभेच्या निवडणूक रणसंग्रामात प्रचाराची धामधूम सुरू आहे. प्रचारादरम्यान मतदारांचा लाभत असलेला प्रतिसाद अवर्णनीय आहे. सजवलेल्या बैलबंडीतून प्रचाराचा माहोल द्विगुणित होत आहे तर ठिकठिकाणी महिला भगिनींनी संजीवरेड्डी बोदकुरवारांचे “औक्षण”करताहेत. The response of the voters during the campaign is indescribable.

मतदारांना मागील दहा वर्षातील विकासकामांचा लेखाजोखा समजावून सांगितल्या जात आहे. यापुढे संपूर्ण मतदारसंघात शाश्वत विकास आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी टेक्सटाईल पार्क, व बेरोजगारांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रकल्प निर्मिती चे स्वप्न असल्याचे बोदकुरवार यांनी स्पष्ट केले आहे.

सोमवारी बोदकुरवार यांचा झरी तालुक्यात प्रचार दौरा होता. गणेशपूर (खडकी) येथून प्रचाराला सुरुवात झाली. त्यानंतर अडेगाव, खातेरा, येडशी, वेडथ, मुकुटबन, पिंपरड, बैलमपूर, राजूर, हिरापूर, मांगली, भेडाळा, येदलापूर, लिंगटी, धानोरा, रायपूर, दुर्भा, खरबडा, पाटण, दिग्रस, सुर्दापूर, कमळवेल्ली, सतपल्ली, उमरी, अहिरल्ली, दाभा, टाकळी असा प्रवास करीत वठोली येथे प्रचाराची सांगता झाली.

सकाळी गणेशपूर (खडकी) येथे आ. बोदकुरवार यांचा प्रचार ताफा पोहोचला. येथील संत जगन्नाथ महाराज देवस्थानात दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर वाजत गाजत गावातून रॅली काढण्यात आली. त्यानंतर खातेरा वेडद येथे प्रचार ताफा पोहोचला. येथील महिला भगिनींनी बोदकुरवार यांचे “औक्षण” केले. यावेळी महिलांनी त्यांच्या सर्व लाडक्या बहिणी त्यांच्या पाठिशी राहणार असे वचन दिले. विशेष म्हणजे प्रचार दौ-यात मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार रॅलीत सहभागी झाले होते.

प्रचार सभेला प्रदेश किसान मोर्चा उपाध्यक्ष दिनकर पावडे, भाजपा तालुकाध्यक्ष झरी(जामनी) सतीश नाखले, ख.वि. अध्यक्ष मुन्ना बोलेलवार, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश मानकर, माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मा आत्राम, माजी सभापती पं.स राजेश्वर गोंड्रावार, भाजपचे जेष्ठ नेते अशोक बोदकुरवार, बंडू वरारकर, माजी तालुकाध्यक्ष संजय दातारकर, शाम बोदकुरवार, माजी पं.स.सभापती लता अत्राम, महिला आघाडी तालुकाध्यक्ष शांताबाई जीवतोडे, मिना आरमुरवार यांच्यासह भाजपा, शिवसेने, रिपाई व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Rokhthok News