● एकदा मनसेला संधी द्या, विकास काय असतो ते दाखवतोच…..!
Political News | विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या हाताला काम नाही, महागाईमुळे माता भगिनी त्रस्त झाल्या आहे. येथील खनिज संपदा लुटल्या जात आहे. विकासाच्या नावावर कमिशनखोरीचे धंदे सुरू झाले आहे. एकदा मनसेला संधी द्या, विकास काय असते ते दाखवतोच असे मत मनसे नेते राजू उंबरकर यांनी व्यक्त केले. Commission business in the name of developmentU
विकासाच्या नावावर कमिशनखोरीचे धंदे सुरू झाले आहे. लोकप्रतिनिधी सत्तेच्या नशेत झिंगून आहेत. सर्व सामान्य नागरिकांची समस्या ऐकायला कुणीही तयार नाही. अशातच जनतेसमोर मनसे हा चांगला पर्याय आहे. या निवडणुकीत मनसेला साथ द्या, विकास काय असते हा येत्या पाच वर्षात जनतेला उघड्या डोळ्यांनी दिसेल. असे आवाहन मनसेचे उमेदवार राजू उंबरकर यांनी शिरपूर शिदोला विभागात आपल्या प्रचार दौऱ्यात मतदारांना केले..
नियोजनबद्द प्रचार सुरु असल्याने मनसे विधानसभा शर्यतीत पुढे आहे. वणी विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी काँग्रेस, शिवसेना, भाजप या सर्व पक्षातील उमेदवारांना निवडून त्याचे परिणाम सुद्धा भोगले आणि भोगत आहे. मात्र यावेळी “कामाचा माणूस” असलेल्या राजू उंबरकर याला एक वेळ संधी द्या,. या संधीच सोन करुन मतदारसंघ राज्यात अव्वल करेल असे मत राजू उंबरकर यांनी मतदारांना केलं.
मतदारसंघाच्या बाबत सतत तळमळीने बोलणारा कार्यकर्ता राजु उंबरकर आहे. त्यांनी आजवर केलेले आंदोलन, शेतकरी हितासाठी केलेला पाठपुरावा सोबतच शेतकरी व सर्वसामान्यांना न्याय मिळावा याकरिता भोगलेली कारागृहाची वारी, मतदारसंघातील मतदार विसरलेत का ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
Rokhthok News