Home Breaking News लोकप्रतिनिधींचा मनसेकडे वाढला कल

लोकप्रतिनिधींचा मनसेकडे वाढला कल

● अनेकांनी घेतला मनसेचा झेंडा खांद्यावर

241
C1 20241115 18573349

अनेकांनी घेतला मनसेचा झेंडा खांद्यावर

Political News | विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेची सर्वत्र हवा पाहायला मिळतं आहे. त्यामुळे अनेक सामजिक, राजकीय संघटनानी मनसेचे उमेदवार राजू उंबरकर यांना उघडपणे पाठींबा घोषित केला आहे. तर अनेकांनी पक्षाचा झेंडा हातात घेऊन पक्ष प्रवेश केला. People’s representatives have increased tendency towards MNS.

दिवसेंदिवस मनसेचा वाढत असलेला जनाधार आणि राजकीय मंडळीचे वाढतं असलेले पक्षप्रवेश या निवडणुकीत मनसेला विजयाश्री मिळवून देण्यास साह्यभूत ठरेल. यातच आज वणी शहरा लगत असलेल्या गणेशपूर येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व अन्य नागरिकांनी शहराध्यक्ष शिवराज पेचे यांच्या नेतृत्त्वात राजू उंबरकर यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

Img 20250103 Wa0009

गणेशपूर येथील भाजपाचे ग्रामपंचायत सदस्य प्रवीण आत्राम, आशिष बोबडे, माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल काकडे, शिवसेना (उद्धव ठाकरे) चे सुधीर खापणे, उषा कोडापे, विजय काकडे, अक्षय बोबडे यांच्या सह अन्य आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व अन्य मंडळींनी पक्षात प्रवेश केला. यावेळी मनसेचे विधानसभा उमेदवार राजू उंबरकर यांनी त्यांच्या गळ्यात पक्षाचा दुपट्टा टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शहराध्यक्ष शिवराज पेचे, सुजित मेश्राम, स्वप्निल लांडगे, जयश बुच्चे, नितीन ताजने आदी उपस्थित होते.
Rokhthok News