Home Breaking News आदिवासी समाज संघटनांचा बोदकुरवार यांना पाठिंबा

आदिवासी समाज संघटनांचा बोदकुरवार यांना पाठिंबा

● बिरसा ब्रिगेड, अ. भा. विकास परिषद व जनसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले पत्र...

306
C1 20241115 07005511

● बिरसा ब्रिगेड, अ. भा. विकास परिषद व जनसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले पत्र…

Political News | विधानसभेची निवडणूक चुरशीच्या वळणावर येऊन ठेपली आहे. चौरंगी लढतीत बाजी कोण मारणार याकडे मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. त्यातच विविध समाज संघटना उमेदवारांना पाठिंबा देत असल्याने झुंज कडवी होणार आहे. बिरसा ब्रिगेड, अ. भा. विकास परिषद व जनसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संजीवरेड्डी बोदकुरवार याना पाठिंब्याचे पत्र देत समाजबांधव भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील अशी ग्वाही दिली आहे. Tribal community organizations support Bodkurwar

वणी विधानसभा क्षेत्रातील काही राजकीय पक्षाच्या उमेदवारा कडील काही राजकिय पुढारी आव्हान करीत आहे की, आदिवासी समाज आमचे पाठीशी आहे. अशी फालतुची अफवा करीत आदिवासीच्या नावावर उभे असलेल्या उमेदवाराकडून मलींदा वसुल करीत असल्याचा व आदिवासींना बदनाम करीत असल्याचा प्रकार आदिवासी सामाजिक संघटनेच्या निदर्शनास आल्याने तिन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

अखील भारतीय विकास परीषदचे तालुका अध्यक्ष तथा नगर सेवक अनिल गेडाम, बिरसा ब्रिगेडचे तालुका मारेगाव चे अध्यक्ष शेषराव मडावी व आदिवासी जनसंग्राम संघटनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्रीधर सिडाम यांनी एकमताने निर्णय घेत भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रचारात उतरून विजयी करण्याचा संकल्प केला आहे.

महायुतीचे उमेदवार बोदकुरवार यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांना परवानगी दिल्याचे पाठिंबा पत्रातून जाहीर केल्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम दूर झाला आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात निवडणूक रंगतदार वळणावर पोहचली आहे. निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे मात्र 23 नोव्हेंबर ला स्पष्ट होणार आहे.
Rokhthok News