● घोषणाबाजी आणि ढोल ताशांच्या गजर
● गावा गावात महिलांची लक्षणीय उपस्थिती
Political News | वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये राजू उंबरकर यांच्या प्रचारसभांना महिलांची तुफान गर्दी होत आहे. वारे फिरल्याचे हे चित्र आहे का? हे जरी कालांतराने उघड होणार असले तरी गावभेटी दरम्यान “असा कसा येत नाही आल्याशिवाय राहत नाही” अशा घोषणा दुमदुमत आहे. “आता आमदार बनवू कामाचा माणूस, राजू उंबरकर या घोषणा नवचैतन्य निर्माण करत आहे. त्यातच उंबरकरांचे भाषण महिलांना भावूक करताहेत. And…Raju Umbarkar’s eloquence of women emotional
विधानसभेचे वारे आता गरम होत असताना यामध्ये उंबरकर यांनी आघाडी घेतल्याचे दिसत आहे. तालुक्यातील नांदेपेरा व वांजरी येथे झंझावाती दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात उंबरकर यांनी गावात प्रवेश करताच गावकऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. उंबरकर यांनी गावातून पदयात्रा करत गावकऱ्यांचे आशिर्वाद घेतले व या निवडणुकीत रेल्वे इंजिन या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
गावागावात होत असलेल्या सभा आणि त्यात उंबरकर डागत असलेली तोफ यामुळे महिला भावूक होत असल्याने निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. यावेळी धनंजय त्रिंबके, फाल्गुन गोहोकार, शुभम भोयर, गुड्डू वैद्य, अंकुश बोढे, दिलीप पेचे, आकाश काकडे, सूरज काकडे, धिरज बगवा, हिरा गोहोकार, प्रशांत तोरे, संजय चौधरी, उदय खिरटकर, प्रतिक बुरटकर, मंगेश आत्राम, रवी दानव, कैलास काकडे, गौरव वाघमारे, सतिश डोनेकर, अविनाश जुनघरी, यांच्या सह मनसेचे सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
Rokhthok News