● विधानसभेच्या तोंडावर जोरदार इनकमिंग
Political News | विधानसभेच्या तोंडावर दिवसेंदिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद वाढताना दिसत आहे. अलीकडील काळातील जोरदार पक्षप्रवेशानंतर आज सुद्धा मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथील तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्यांसह इतर युवकांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांच्या हस्ते मनसेत पक्ष प्रवेश केला. Gram Panchayat member with Tantamukti President in MNS party
निवडणुकीच्या रणधुमाळीत मनसेत होत असलेली जोरदार इनकमिंग पक्षाला बळकटी देणारी ठरत आहे. याचा फायदा या निवडणुकीत पक्षाला नक्की होणार असल्याची चर्चा मतदारसंघात आहे. नरसाळा येथील तंटामुक्ती अध्यक्ष रवी बाभडे, ग्रामपंचायत सदस्य धनंजय तोडासे, महेंद्र तिखट, प्रदीप आत्राम, प्रशांत कडुकर,आदिवासी समाज संघटनेचे अमोल उईके, सोपान बोढे, रामदास डाहुले, विशाल गोहरकार, सुरज रायपुरे, ज्ञानेश्वर मोहूर्ले, गजानन नेहारे, ऋषिकेश उईके यांच्यासह अन्य सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षांमध्ये प्रवेश केला.
पक्ष प्रवेशानंतर राजू उंबरकर यांनी पक्षप्रवेश करणाऱ्यांचे स्वागत केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पक्ष संघटन वाढण्या सोबतच निवडणुकीत विजयश्री आपणच खेचून आणणार असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. तसेच तडफेने पक्षाचे काम करू अशी ग्वाही दिली. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, महिला तालुकाध्यक्ष उज्वला चंदनखेडे, नागेश रायपुरे, विशाल रोगे, शुभम भोयर, प्रशांत तोरे, सुरज नागोसे यांच्यासह मारेगाव तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
Rokhthok News