● भव्य रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
● मनसेचे जोरदार शक्तिप्रदर्शन
Political News | विधानसभेच्या निवडणुकीत प्रचार यंत्रणा अंतिम टप्प्यात पोहचली आहे. मनसेचे उमेदवार राजू उंबरकरांनी रविवारी प्रचार रॅलीचे आयोजन केले होते. हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅलीला संबोधित करताना राजू उंबरकरांनी सत्ताधाऱ्यावर तोफ डागली. तसेच जातीपातीचे राजकारण न करता मतदारसंघ समृद्ध कसा होईल हेच स्वप्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. The assembly election campaign has reached its final stage.
वणी विधानसभेची निवडणूक आता प्रत्येक उमेदवारासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. चौरंगी लढतीत खरा बाजीगर कोण ठरेल हे काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. रविवारी मनसेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. भव्य रॅली काढून वणी मतदार संघात मनसेची वाढलेली ताकद काय ते दाखवून दिले.
मनसेचे उमेदवार राजु उंबरकर यांनी सत्ताधाऱ्यावर तुफानी हल्ला चढवला. त्या प्रमाणेच मविआ च्या उमेदवारांवर घणाघाती टीका केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कधीच जातीपातीचे राजकारण करत नाही. सर्वसमावेशक शेतकरी हिताचा निर्णय घेऊन मतदारसंघ समृद्ध कसा होईल हीच प्राथमिकता असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
उंबरकरांनी चौफेर फटकेबाजी यावेळी केली. मतदारसंघातील प्रत्येक व्यक्ती माझ्या कुटुंबातील सदस्य आहे. त्याला ठेच लागली तर मला कळ लागत असल्याचे भावूक वक्तव्य त्यांनी केले. कोणतीही आपदा आली तर सर्वात पुढे मनसेचे कार्यकर्ते असतात. अपघात झाल्यास महाराष्ट्र सैनिक सर्वोतोपरी मदत करत असल्याचे मतदारसंघात सर्वोश्रुत आहे. गरीब रुग्णांना आर्थिक मदत करून त्यांच्यात जगण्याचं बळ निर्माण करण्याचं खरं धाडस उंबरकरच करतात हे मतदारांना माहीत आहे.
Rokhthok News