● खा. संजय देशमुखांनी डागली तोफ
● देरकरांच्या भव्य रॅलीने शहर दणाणले
Political News | महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांनी रविवारी भव्य रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी खा. संजय देशमुख यांनी सत्ताधाऱ्यावर सडकून टीका केली. जातिजातीत तेढ निर्माण करून राजकारण करणे भाजपची संस्कृती आहे. महायुतीचे ध्येय धोरण शेतकरी विरोधी असल्याचे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. DANKA…Mahayuti’s mission policy is anti-farmer
महाविकास आघाडीचे शीवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार संजय देरकर यांनी रविवारी भव्य रॅलीचे आयोजन केले होते. मतदारसंघातील हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता. प्रचाररथावर खा. संजय देशमुख, माजी आमदार वामनराव कासावार, संजय निखाडे, वर्षा निकम, आशिष खुळसंगे तसेच मविआ चे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी तुफान फटकेबाजी मान्यवरांनी केली, सरकारने शेतकऱ्यांकडे कधी लक्ष दिले नाही. खोटारडया सरकारने शेतकऱ्यांना देशाधडीला लावले आहे. जाती जातीत भांडणे लावली आहे. कुनबी, मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणावरून टोलवा टोलवी करतांना दिसत आहे. महायुतीचे ध्येय धोरण शेतकरी विरोधी असल्याचे ते म्हणाले.
वणी विधानसभेची निवडणुक अतिषय चुरशीची होणार असल्याचे चित्र आज दिसत आहे. प्रचार यंत्रणेच्या शेवटच्या टप्प्यात प्रमुख उमेदवार आपली संपुर्ण ताकद पणाला लावत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांना ग्रामीण भागातुन मिळत असलेला पाठिंबा उत्स्फुर्त आहे. शेतकरी वर्ग भाजपावर कमालीचा नाराज असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष कॉंग्रेस निवडणुक रिंगणात असलेल्या शिवसेना उबाठा चे उमेदवार संजय देरकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दिसत आहे. माजी वामनराव कासावार व कॉंग्रेस पक्षाचे नेते मंडळी उत्स्फूर्तपणे प्रचार यंत्रणा राबवत आहे. एकुनच महाविकास आघाडी लोकसभेची पुनरावृत्ती करणार का हे अवघ्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.
Rokhthok News