Home Breaking News कुनबी व लोहार समाज उंबरकरांच्‍या पाठीशी

कुनबी व लोहार समाज उंबरकरांच्‍या पाठीशी

● मनसेने प्रचारात मारली मुसंडी

768
C1 20241118 15561708

मनसेने प्रचारात मारली मुसंडी

Political News |- वणी विधानसभा निवडणुकीत महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेने प्रचार यंत्रणेत चांगलीच मुसंडी मारली आहे. विवीध जाती धर्माच्‍या समाज बांधवांनी समर्थन दर्शवल्‍यामुळे निवडणुक बलाढ्य उमेदवारात अटीतटीची झाली आहे. अखील भारतीय समस्‍त कुनबी समाज संस्‍था व लोहार समाज संघटनेच्‍या पदाधिकाऱ्यांनी मनसेचे उमदेवार राजु उंबरकर यांच्‍या समर्थनार्थ पाठींबा दर्शवला आहे. Kunbi and Lohar community with Umbarkars

वणी विधानसभेमध्‍ये प्रमुख चार बलाढ्य उमेदवारात तुल्‍यबळ लढत होणार असल्‍याचे चित्र निर्माण झाले आहे. प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असल्‍याने अखेरच्‍या दोन दिवसात सामाजीक,पक्षीय व जातीय समिकरणाची जुळवाजुळव करून एकगठ्ठा मतांचा लाभ मिळवण्‍याच्‍या दृष्‍टीने उंबरकर रणनीती आखत आहे.

अखील भारतीय समस्‍त कुनबी समाज संस्‍थेच्‍या प्रमुख कार्यकर्त्यांनी समर्थनार्थ पत्र दिले आहे. यामध्‍ये गोविंद थेरे, रमेश पेचे, सचिन देवतळे, योगेश काळे, गोवर्धन पिदुरकर, कैलास काकडे, सुरेश काकडे, विनोद कुचनकर, करीष्‍मा कुचनकर, अर्चना देवतळे, सिताराम गौरकार, प्रशांत मोहीतकर, निकेश गौरकार, आकाश काकडे, योगेश मते, अतुल झाडे, निकेश्‍ नवले, राजु बोदाडकर, विलन बोदाडकर या समाज बांधवांच्‍या स्वाक्षरी समर्थनार्थ पत्रावर आहे.

लोहार समाज संघटनेच्‍या वतीने दिलेल्‍या समर्थनार्थ पत्रात “कामाचा माणुस” म्‍हणुन कायम मतदारसंघात ओळखल्‍या जात असलेल्‍या राजु उंबरकरांना तळागाळातील सर्व समाजासाठी भरीव कार्य दाखवण्‍याची क्षमता व सामाजीक बांधलकी अनुभवल्‍याचे पत्रात नमुद केले आहे. विधानसभा निवडणुकीत संपुर्ण समाज ताकदीने पाठीशी उभा राहील व विजय निश्‍चीत करण्‍याची जबाबदारी समाज बांधवांनी स्‍वीकारून पाठींबा दिल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. समर्थनार्थ पत्रात अध्‍यक्ष नितीन धाबेकर, कार्याध्‍यक्ष राहुल चटटे, सचिव क्षिरीष क्षिरसागर यांनी स्वाक्षरी केल्‍या आहे.
Rokhthok News

Previous articleमविआला सकल कुणबी समाजाचा पाठिंबा
Next articleचुरशीच्या लढतीत कोण ठरणार बाजीगर
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.